माहेरी आलेल्या नव्या नवरीला लागलेली 'त्याची' ओढ, तो आला अन्..

Extramarrital affairs : लग्न होऊन नुकतीच माहेरी आलेली पत्नी पुन्हा आपल्या सासरी गेलीच नाही. ती अचानकपणे तिथून गायब झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.

Extramarrital affairs After marriage the young woman returned to her mother house and eloped with the young man

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

28 Jul 2025 (अपडेटेड: 29 Jul 2025, 09:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणी माहेरी आली आणि त्यानंतर सासरी गेलीच नाही

point

कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

Extramarrital affairs : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. लग्न होऊन नुकतीच माहेरी आलेली पत्नी पुन्हा आपल्या सासरी गेलीच नाही. ती अचानकपणे तिथून गायब झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ही बातमी सर्वत्र पसरताच एकच खळबळ उडाली आहे. सासरच्यांना रक्षाबंधनासाठी जायचं असल्याचं सांगून नवविवाहित तरुणी ही तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. हे प्रकरण कानपूरमधील बिल्हौर येथील आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...

नेमकं काय घडलं? 

विवाहित तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता, ती सापडली नाही. त्यानंतर त्यांना संशय आला की, ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली असावी. त्यानंतर त्यांना कळालं की, तिचा प्रियकरही बेपत्ता आहे. या संशयामुळे तिच्या कुटुंबाचा तरुणीवरील विश्वासच उडून गेला होता. तरुणीच्या वडिलांचं म्हणणं आहे की, संबंधित तिचा प्रियकर तिला लग्नासाठी धमकवायचा. त्यानेच तिला पळवून नेलं असावं असा त्यांचा संशय बळावला गेला. त्या मुलाने तिला वारंवार लग्न करण्यास दबाव आणला होता, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. 

सध्या पोलिसांनी कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. बेपत्ता झालेल्या तरुणीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रर दाखल केली. आमच्या घराजवळ पोस्ट ऑफिसच्या गल्लीत एक तरुण राहतो. तो आमच्या मुलीच्या मागे लागला होता. तो तिला लग्नासाठी सतत त्रास देत होता. त्यानंतर आम्ही आमच्या मुलीचा विवाह हा दुसरीकडे लावून दिला. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, 23 जुलै रोजी कामानिमित्त बाहेर गेले असता, ती मुलगी बेपत्ता झाल्याचं उघडकीस आलं. 

तरुणीने भूतकाळातील घटनांची माहिती दिली

आरोपी तरुणाने भूतकाळातील घटनांबाबत पोलिसांनी माहिती दिली. लग्नाच्यापूर्वी तो तरुण त्याच्या मुलीसोबत अनेकदा दिसला होता, त्यावर मुलीने तिच्या कुटुंबाला सांगितलं की, तो तरुण अनेकदा तिला बाहेर त्रास देतो. कुटुंबातील सदस्य स्पष्टपणे सांगतात की, त्याच मुलाने तिला पुन्हा एकदा धमकावत पळवून नेलं. तरुणी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य घाबरत आहेत. तरुणीचा संसार मोडला जाईल, याची त्यांना भिती वाटू लागली आहे. 

हेही वाचा : मंगळ ग्रहाने राशी बदलली, काही राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ, तुमच्या राशीबाबत घ्या जाणून

कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, तरुणी आपल्या माहेरी आल्यानंतर तिच्या आई-वडिलांच्या घरी आल्यापासून तो तरुण सतत तिला भेटण्याची विनंती करत होता. तरुणीने तिच्या आईला सांगितलं की,तरुण तिला जबरदस्तीने कुठंतरी घेऊन गेला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आलं की, लग्नापूर्वी मुलीचे त्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. याबाबत ग्रामस्थांना माहिती होती, पण मुलीच्या कुटुंबाला तो मुलगा पसंद नव्हता. 
 

    follow whatsapp