Crime News: कर्नाटकच्या चित्रदुर्गमधून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. एक 23 तरुण वर्षीय टेस्टमध्ये HIV पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्याची बहीण आणि मेहुण्याने मिळून तरुणाची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचा नुकताच अपघात झाला होता. त्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याची रक्त तपासणी केली असता, तो HIV पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं.
ADVERTISEMENT
पतीसोबत मिळून भावाची हत्या
प्रकरणातील आरोपी म्हणजेच पीडित तरुणाची बहीण पोलिसांच्या ताब्यात असून तिचा पती अद्याप फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी मेहुण्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला. 25 जुलै रोजी पीडित तरुणाची ब्लड टेस्ट केली असता तो HIV पॉझिटिव्ह आढळल्याने पतीसोबत मिळून भावाची हत्या केल्याचं आरोपी बहिणीने सांगितलं.
हे ही वाचा: पुणे: ऑफिसच्या 7 व्या मजल्यावरुन उडी अन् सुसाइड नोटसुद्धा... पुण्यातील IT इंजिनीयरचं टोकाचं पाऊल
सामाजिक अपमानाची भिती
भावाच्या आजाराची बातमी पसरली असता कुटुंबाला सामाजिक अपमानाला सामोरे जावे लागेल आणि गावकरी तसेच नातेवाईक त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची भिती असल्याचं आरोपी महिलेनं सांगितलं. याव्यतिरिक्त, पीडित तरुणाचे आई-वडील उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या आजारांनी ग्रस्त असून भावाचा हा आजार त्यांच्यापर्यंत पोहचू शकत असल्याची चिंता सुद्धा आरोपी महिलेला होती. चौकशीदरम्यान, पीडित तरुण खूप कर्जबाजारी असल्याचं त्याच्या बहिणीने सांगितलं.
हे ही वाचा: वसई हादरली! तरुणाने आपल्या आईचं डोकं भिंतीवर आपटलं, नंतर लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, कारण ऐकून उडेल थरकाप
एचआयव्ही पॉझिटिव्ह असणं म्हणजे काय?
एचआयव्ही पॉझिटिव्ह असणं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) असणं. हा विषाणू मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. तसेच, एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने एखाद्या व्यक्तीला लगेच एड्स (अॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम) होईल, असं अजिबात नाही. एड्स हा एचआयव्हीचा पुढचा टप्पा आहे. या आजाराने रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते आणि शरीरात इतर गंभीर आजार किंवा संसर्गांशी लढण्याची ताकद राहत नाही.
ADVERTISEMENT
