उपचाराच्या नावाखाली भलतंच काही तर, महिलेला केले बेशुद्ध आणि नंतर रात्रभर...

Crime News : एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. नेमकं काय घडलं ते पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.

crime news (Grok)

crime news

मुंबई तक

27 Jul 2025 (अपडेटेड: 29 Jul 2025, 05:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीवर रुग्णालयात लैंगिक शोषण

point

इंजेक्शन दिलं आणि लैंगिक अत्याचार केला

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. महिलेवर उपचार करण्याच्या बहाण्याने तिला भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर महिला बेशुद्ध पडली आणि नंतर उपचारादरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित प्रकरणात रूग्णालयातील आरोपी कर्मचाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पीडितेनं संबंधित प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे घडली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंची मातोश्रीकडे पावलं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार... नेमकं काय घडलं?

कर्मचाऱ्यानं इंजेक्शन टोचलं आणि तरुणी बेशुद्ध 

पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितलं की, 25 जुलै रोजी बलरामपूर येथील पचपेवडा ठाणे अंतर्गत विमला विक्रम रुग्णालयात ही घटना घडली आहे. गैसडी येथे राहणारी 28 वर्षीय तरुणी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. त्यानंतर रुग्णालयातील पीडितेला तिथल्या एका कर्मचाऱ्याने इंजेक्शन टोचलं आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली. तेव्हाच तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. 

पीडित तरुणी जेव्हा शुद्धीत आली तेव्हा आपलं लैंगिक शोषण झाल्याचं तिला समजलं. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तिची सर्व बाजू ऐकून नराधमावर भारतीय न्यायसंहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हेही वाचा : धावत्या कारमध्ये नराधमांनी तरुणीला ओढलं, नंतर तिचे कपडे काढले अन् रात्रभर...लोणावळ्यातील मन हेलावून टाकणारी घटना

या प्रकरणानंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत. रुग्णालयात असलेल्या रुग्णांना इंजेक्शन देण्याची परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पोलीस अटकेत असलेल्या आरोपीची चौकशी करत आहेत. 

    follow whatsapp