लोणावळ्यात धावत्या कारमध्ये नराधमांनी तरुणीला ओढलं, नंतर तिचे कपडे काढले अन् रात्रभर...
Pune crime : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 23 वय वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्येच लैंगिक शोषण करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लोणावळ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली

तरुणीवर चालत्या कारमध्येच लैंगिक शोषण

चालकांसह तिघांकडून हैवानी कृत्य
Pune crime : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 23 वय वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्येच लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. चालकांसह तिघांनी हे हैवानी कृत्य केल्याची माहिती उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. या घटनेनं लोणावळ्यातील पर्यटकांच्यात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंची मातोश्रीकडे पावलं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार... नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात लोणावळा पोलिसांनी सांगितलं की, पीडित महिला ही शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान,तंगार्ली येथील नारायणी धाम येथील मंदिराजवळून जात असताना एक कार आली. त्या कारमध्ये तीन अज्ञात इसमांनी तिचं अपहरण केलं, त्यानंतर तिला गाडीत बसवलं. तेव्हा तिचा गळा दाबण्यात आला होता, तिचे हातपाय बांधले, तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि त्यानंतर जबरदस्तीने तिचे कपडे काढले आणि त्यानंतर रात्रभर दिला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी पहाटे पीडितेला एका नांगरगावाजवळ एका निर्जनस्थळी रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलं, त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिचं अपहरण आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याखाली लोणावळा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी 12 तासाचत एका नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर लोणावळा पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे यांनी संबंधित प्रकरणाची पुष्टी केली. उर्वरित दोघांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुणे प्लस या वृत्तमाध्यमाने दिली आहे.
आरोपीची ओळख :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक नराधमाची शरीरयष्टी जाड असून उंची 5.5 फूट आहे. दुसऱ्या आरोपीचं वय वर्षे 30 आहे. त्यानं पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्याची उंची 6 फूट असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : Viral Story : एका वर्षाच्या मुलाने सापाचाच घेतला चावा, सापाचा गेला जीव, डॉक्टर काय म्हणाले?
तिसऱ्या आरोपीनेही राखाडी रंगाचा शर्ट परिधान केला होता. शरीरयष्टी मध्यम स्वरुपाची होती. तर उंची 5.5 उंची होती. चेहऱ्याचा रंग हा काळपटच असल्याची ओळख पीडितेनं तक्रारीत नमूद केलं. संबंधित प्रकरणात जिथं ही घटना घडली तिथले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. लोणावळा आणि आसपासच्या परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.