मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंची मातोश्रीकडे पावलं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार... नेमकं काय घडलं?
uddhav Thackeray Birthday : राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या भावाला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी गेले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन दिल्या शुभेच्छा

नेमकं काय घडलं?
Raj Thackeray on matoshree : राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 27 जुलै रोजी 65 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी गेल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. गेल्या काही दिवसानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दुसऱ्यांदा एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळालं आहे. यावेळी राज ठाकरेंचे निष्ठावंत नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई देखील होते. तर दुसऱ्या बाजूला उबाठा नेते आंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते.
हेही वाचा : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंची मातोश्रीकडे पावलं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार... नेमकं काय घडलं?
नेमकं मातोश्रीवर काय घडलं?
राज ठाकरे हे सकाळी 11 वाजता मातोश्रीकडे निघाले होते. त्यानंतर 12 वाजता राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले असता, राज ठाकरेंनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी स्वत: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे राज ठाकरे यांना घेण्यासाठी गेले होते. दोघांनीही फोटोसेशन केलं. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दोघांच्यात सध्या बंद दाराआड अनैपचारिक चर्चा सुरू असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आनंदी
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे हे स्वत: कार्यकर्त्यांना भेटत असल्याने कार्यकर्त्यांच्या पोटात आनंद मावेनासा झाला आहे. मातोश्रीवर फुलांची सजावट दिसत आहे.
हेही वाचा : Mumbai Crime आरोपीनं महिला बँक कर्मचारालाही सोडलं नाही, घरचा पत्ता पडताळणीसाठी आली...मानेवर अन् गालावर केलं किस
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत हे शिवसेना दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. काही वर्षानंतर मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वरळीत एकत्र आले होते. त्यानंतर आता राज ठाकरे हे मातोश्रीवर आल्यानंतर दोघांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर फोटोसेशन केलं. हे फोटोसेशन युतीचे तर संकेत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.