Mumbai Crime आरोपीनं महिला बँक कर्मचाऱ्यालाही सोडलं नाही, घराचा पत्ता पडताळणीसाठी आली...मानेवर अन् गालावर केलं किस
Mumbai Crime : व्यवसायिकानं महिला बँक कर्मचाऱ्याशी जबरदस्ती करत तिचा किस घेतल्याची घटना मुंबईच्या मालाडमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना

व्यवसायिकाने महिला बँक कर्मचारीचा घेतला किस

नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : मुंबईतील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 54 वर्षीय व्यवसायिकाला दंडाधिकारी न्यायालयाने एका वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एका महिला बँक कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यवसायिकाने जबरदस्ती महिलेचा किस घेतल्याचं हैवानी कृत्य केलं आहे. या कृत्यामुळे व्यवसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित प्रकरणात आता बी.एन. चिकणे म्हणाले की, तक्रारदार हा काम करत असताना महिला ही आरोपीच्या घराच्या पत्त्याची चाचपणी करण्यासाठी गेली होती. आरोपी हा घरी एकटाच होता. त्याने महिलेवर जबरदस्ती विनयभंग केला. दरम्यान, तक्रारदार ही बँक कर्मचारी होती. संबंधित प्रकरणात न्यायालयाने सांगितलं की, आरोपीने केलेल्या या कृत्यामुळे त्याची सुटका करणं अवघड आहे. न्यायालयाने त्याला दोषी असल्याचं म्हटलं आहे. तसेच संबंधित आरोपीवर एक हजारांचा दंड ठोठावला आहे. पण आता तोच आरोपी जामिनीच्या जोरावर पुन्हा बाहेर आल्याची माहिती समोर आली.
या घडलेल्या घटनेत कोणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याचे दंडाधिकारी म्हणाले आहेत. महिला या घटनेदरम्यान परिपूर्ण भयभीत झाली होती. ती तिच्या म्हणण्यावर ठामच होती. महिला भयभीत झाल्याने तिनं उशीरा तक्रार दाखल केल्याचं म्हणणं आहे. या प्रकरणात मॅजिस्ट्रीटने सांगितलं की, भारतीय महिला या समाजासमोर बेधडकपणे स्वत:ला उगड करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करते. अशा घटनेमुळे महिला भयभीत हे सामान्य असल्याचं मॅजिस्ट्रेटनं सांगितलं.
नेमकं काय घडलं?
नरेंद्र सागवेकर नावाच्या एका व्यक्तीने 26 नोव्हेंबर 2020 रोजी बँकेचं खातं उघडण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. त्याने त्याचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड बँकेत दिले. बँकेच्या नियमावलीनुसार, खाते उघडण्यासाठी घरच्या पत्त्याची पडताळणी करणे अनिवार्य असते. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारच्या सुमारास 12:30 वाजता बँक कर्मचारी महिला आरोपीच्या घरी पोहोचली. तेव्हा ती महिला आरोपीच्या घराच्या पत्त्याची पडताळणी करत होती.
आरोपी घरी एकटाच होता, काम संपवून ती महिला घरी निघाली होती. त्याच क्षणी आरोपीने तिला मागून पकडले आणि तिच्या मानेवर त्यानंतर गालावर किस घेतला. त्यानंतर त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि शरीरावरून हात फिरवू लागला होता. तेव्हा महिलेनं आरोपीला ढकलले आणि पीडित महिलेनं घटनास्थळावरून पळ काढला.
त्यानंतर ती जेव्हा बँकेत परतली असता, बँक, मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर, आणि एका सहकाऱ्याला घटनेची माहिती दिली. यानंतर तिने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी संबंधित आरोपी व्यवसायिकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.