Minor Girl Rape Case : उत्तरप्रदेशच्या औरेया परिसरात एका अल्पवयीन तरुणीने तिच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत. तरुणीने आरोप केला आहे की, तिच्यावर बलात्कार करण्यासाठी आईने तिच्या प्रियकराला सांगितलं होतं. या घटनेसंबंधी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, पोलिसांनी या घटनेमागं मोठा प्लॅन असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कोतवाली पोलीस ठाणे परिसरात पीडिता राहते. तिने पोलिसांना सांगितलं की, ती अकरावीची विद्यार्थीनी आहे. तिच्या आईचं गावातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहे. करण असं त्या तरुणाचं नाव आहे. तो नेहमी तिच्या आईला भेटायला यायचा. त्यानंतर तो रुममध्ये जायचा आणि दरवाजा बंद करून घ्यायचा.
आईने प्रियकराला रुममध्ये पाठवलं आणि..
करण पीडित तरुणीच्या आईला दोन दिवसांपूर्वी भेटायला गेला होता. त्याचदरम्यान अचानक तो तिच्या रुममध्ये घुसला आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या आईने स्वत:च त्या तरुणाला तिच्या रुममध्ये पाठवलं होतं आणि बाहेरून कडी लावली होती. त्यानंतर तिच्या बलात्काराचा व्हिडीओही बनवला.
हे ही वाचा >> Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...
पीडितेनं म्हटलंय की, जेव्हा तिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत वडिलांना सांगायचा प्रयत्न केला, तेव्हा दोघांनीही तिला मारहाण केली. तसच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. आरोपी करणने याआधीही अनेकदा तरुणीची छेडछाड केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिकारी राजकुमार सिंग यांनी म्हटलंय की, पीडित तरुणीची मेडिकल टेस्ट करण्यात आलीय. पीडिता सतत तिचा जबाब बदलत आहे. तिच्या आरोपामागचं सत्य शोधावं लागणार आहे. पीडितेला तिच्या आईला फसवायचं आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. पीडितेची आई आणि तिचे वडील यांच्यात वादविवाद होत होते, अशीही माहिती समोर आलीय. या घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.
हे ही वाचा >> ठाणे जिल्हा हादरला! आईनेच पोटच्या लेकरांच्या जेवणात मिसळलं विष, हादरून टाकणारी घटना
ADVERTISEMENT
