Wife Kills Husband Shocking News : पती-पत्नीचं नातं सात जन्मांचं असतं. पण आताची परिस्थिती काहीसी वेगळी झाली आहे. कारण लग्नानंतर अनेक महिला अनैतिक संबंधाच्या वासनेपोटी पतीची फसवणूक करतात. अशाच प्रकारची घटना बिहारच्या समस्तीपूरमध्ये घडली आहे. येथील एका महिलेनं तिचा पती आणि दोन मुलांना धोका देत परपुरुषासोबत अफेअर सुरु केला. पतीने त्याच्या पत्नीला जेव्हा रंगेहाथ पकडलं, तेव्हा तिने प्रियकरासोबत मिळून मोठं कांड केलं. तिने पतीची हत्या करून मृतदेह लपवला. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ही घटना लगूनियां रघुकंठ परिसरात घडली. येथील 30 वर्षांचा सोनू कुमार त्याची पत्नी स्मिता आणि दोन मुलांसोबत राहत होता.
ADVERTISEMENT
सोनू एक ऑटो चालक होता. रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पण ज्या पत्नीसाठी तो एव्हढी मेहनत करत होता, तिनेच परपुरुषासोबत अनैतिक संबंध सुरु केले. स्मिताने तिच्या मुलांसाठी हरिओम कुमार नावाच्या टीचरला हायर केलं होतं. तो रोज स्मिताच्या मुलांना शिकवत होता. त्याने स्मितासोबत जवळीक वाढवल्याने त्यांच्यात अफेअर सुरु झालं. सोनूला याबाबत काहीच कल्पना नव्हती.
हे ही वाचा >> पुण्यात खळबळ! पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक!
सोनूने दोघांना रंगेहाथ पकडलं अन्..
हरिओम आणि स्मिता दोघेही सोनूच्या गैरहजेरीत अनैतिक संबंध करायचे. त्यावेळी ते मुलांना बाहेर खेळायला पाठवायचे. त्यामुळे कोणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता. दोघांमध्ये काही दिवस हे प्रेमप्रकरण सुरु राहिलं. पण एक दिवस सोनुने दोघांनाही संबंध करताना पाहिलं. त्यानंतर पतीचं टेन्शन वाढलं. त्यानंतरच दोघांमध्ये वादविवाद सुरु झाला.
6 वर्षांपूर्वी सोनूचं लग्न झालं होतं
सोनूचे वडिल टुनटुन यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री जवळपास 12 वाजताच्या सुमारास सोनू घरी परतला होता. त्यानंतर शनिवारी त्याचा मृतदेहच सापडला. त्यानंतर सोनूच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सोनूची पत्नी स्मिताला अटक केली. पोलीस दोघांचीही कसून चौकशी करत आहेत. सोनू आणि स्मिताचं 6 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तपासात समोर आलं की, लग्नानंतर सोनू आणि त्याची पत्नी स्मिता यांच्यात आधीही वादविवाद होत होते.
हे ही वाचा >> आत्याच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, पतीला गोळ्या घातल्या अन्... 1100 किमी दूर हॉटेलमधून अटक
ADVERTISEMENT
