प्रायव्हेट पार्टमधून रक्त, 5 वर्षांची चिमकुली सापडली 'त्या' अवस्थेत; तुमचंही रक्त खवळेल अशी घटना!

बिहारच्या गयाजीमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिचा गळा दाबून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पीडित मुलीच्या गळ्यात गमछा बांधलेला होता आणि मुलीचे कपडे अस्ताव्यस्त असून तिच्या गुप्तांगातून रक्त येत होतं.

5 वर्षांच्या मुलीसोबतच केलं घृणास्पद कृत्य अन् नंतर...

5 वर्षांच्या मुलीसोबतच केलं घृणास्पद कृत्य अन् नंतर...

मुंबई तक

29 Jul 2025 (अपडेटेड: 30 Jul 2025, 09:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि नंतर निर्घृणपणे हत्या

point

घटनास्थळी पीडितेच्या गुप्तांगातून रक्त आणि कपडे सुद्धा अस्ताव्यस्त...

Rape Case: बिहारच्या गयाजीमध्ये एक घृणास्पद घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिचा गळा दाबून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मुलीचा शोध घेत घटनास्थळी पोहचल्यानंतर तिथलं दृश्य पाहताच पीडितेच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली. पीडित मुलीच्या गळ्यात गमछा बांधलेला होता आणि मुलीचे कपडे अस्ताव्यस्त असून तिच्या गुप्तांगातून रक्त येत होतं. त्यावेळी मुलगी मृतावस्थेत पडली होती. नेमकी घटना काय? 

हे वाचलं का?

बहिणीसोबत बाजारात गेली अन्...

खरंतर, 5 वर्षीय पीडित मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसोबत 3 वाजताच्या सुमारास डोभीच्या पीपरघट्टी बाजारात औषधं आणायला गेली होती. औषधं घेतल्यानंतर पीडितेची बहीण तिच्या घरी पोहचली परंतु, अल्पवयीन पीडिता सायंकाळ झाली तरी घरी परतली नाही. यानंतर, मुलीच्या मोठ्या बहिणीने तिच्या वडिलांना याबद्दल सांगितलं. पीडिता बेपत्ता असल्याचं समजताच तिच्या कुटुंबियांनी सुमारे 7 वाजता मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

हे ही वाचा: ब्लड टेस्टमध्ये HIV पॉझिटिव्ह... बहीण आणि मेहुण्याने मिळून तरुणाला संपवलं! नेमकं प्रकरण काय?

पीडितेच्या गुप्तांगातून रक्त...

मुलीच्या कुटुंबातील सदस्य पीडितेचा शोध घेत रात्री उशीरा नर्सरीच्या एका मोडकळीस आलेल्या खोलीत पोहचले. मात्र, खोलीच्या आतील दृश्य हृदयद्रावक होतं. घटनास्थळी रक्ताचे डाग होते आणि मुलीच्या गळ्यात गमछा बांधलेला होता. तसेच, मुलीचे कपडे देखील विस्कटलेले असून तिच्या गुप्तांगातून रक्त येत होतं. पीडितेला मृतावस्थेत पाहिल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. 

पीडितेच्या आईला कोणावर संशय? 

त्यानंतर, कुटुंबियांनी तिचा मृतदेह घरी आणला आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. घरातील सदस्यांची चौकशी केली असता पीडितेची आई म्हणाली, "माझ्या मुलीची अशी अवस्था करण्यामागे कोण आहे हे मी निश्चितपणे सांगू शकत नाही, पण शेजारच्या परिसरातील एका मुलावर मला संशय आहे. 15 दिवसांपूर्वी माझ्या घरातून पैसे चोरीला गेले होते. त्यावेळी मी त्या मुलाला पैसे चोरले असतील तर परत करण्यास सांगितले. परंतु तो म्हणाला, 'जे काही करायचे ते कर, मी पैसे चौरले नाहीत.'"

हे ही वाचा: पुणे: ऑफिसच्या 7 व्या मजल्यावरुन उडी अन् सुसाइड नोटसुद्धा... पुण्यातील IT इंजिनीयरचं टोकाचं पाऊल

मुलीच्या आईने शेजारील अल्पवयीन मुलावर संशय व्यक्त केला आणि पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीच्या कपड्यांना देखील ताब्यात घेतलं असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांकडून पोलिस स्टेशनमध्ये अद्याप कोणताही अर्ज दाखल केलेला नाही.

    follow whatsapp