Rape Crime News : उत्तरप्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेवर आयसीयूत उपचार सुरु होते. याचदरम्यान एका नराधमाने महिला रुग्णावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. रुग्णालयातील एका कम्पाऊंडरने महिलेला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना बलरामपूरच्या पचपेडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या विमला विक्रम रुग्णालयात घडली. येथील एक 28 वर्षीय महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती.
ADVERTISEMENT
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, 25 आणि 26 जुलैच्या रात्री महिला आयसीयूच्या बेडवर विश्रांती घेत होती. तेव्हा रुग्णालयातील कर्मचारी योगेश पांडे तिच्याजवळ गेला. आरोप केला जात आहे की, योगेशने उपचाराच्या बहाण्याने महिलेला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं. जेव्हा महिला पूर्णपणे बेशुद्ध झाली, तेव्हा त्याने तिच्यासोबत अत्याचार केला. जेव्हा तरुणी शुद्धीवर आली, तेव्हा तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचं समजलं. त्यानंतर पीडित तरुणीने तातडीनं तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
हे ही वाचा >> Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...
पोलिसांनी काय म्हटलंय?
बलरामपूरचे पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी याप्रकरणाची पुष्टी करत म्हटलं की, आरोपी योगेश पांडेला अटक केली आहे आणि पुढील कारवाई करण्यात येत आहे.
त्या ठिकाणीही घडली बलात्काराची घटना
उत्तरप्रदेशच्या औरेया परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली होती. येथील एका अल्पवयीन तरुणीने तिच्या आईवर गंभीर आरोप केले होते. तरुणीने आरोप केला होता की, आईने प्रियकराला तिच्यावर बलात्कार करण्यासाठी सांगितलं होतं. पीडित तरुणीने या घटनेबाबत पोलिसांना माहिती देत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा >> महिला शेजाऱ्यासोबत नको ते करायची..तिच्या 24 वर्षांच्या मुलानं पाहिलं! नंतर झाला खतरनाक मर्डर अन्..
ADVERTISEMENT
