महिला शेजाऱ्यासोबत नको ते करायची..तिच्या 24 वर्षांच्या मुलानं पाहिलं! नंतर झाला खतरनाक मर्डर अन्..

Shocking Murder Case Viral News :  बिहारच्या मोतिहारी बरियापूर वॉर्ड नंबर 44 मध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं अनेकांना धक्काच  बसला आहे.

Shocking Murder Case Viral News

Shocking Murder Case Viral News

मुंबई तक

• 09:41 PM • 28 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आईनं पोटच्या पोराचा केला खून..

point

दोघांनीही संतुच्या हत्येचा कट रचला आणि...

point

त्या गावात घडली भयंकर घटना

Shocking Murder Case Viral News :  बिहारच्या मोतिहारी बरियापूर वॉर्ड नंबर 44 मध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं अनेकांना धक्काच  बसला आहे. महिला शेजाऱ्याशी दिवसरात्र फोनवर बोलायची आणि चोरून त्याला भेटायची. 24 वर्षांच्या मुलाच्या आईचं शेजाऱ्याशी अफेअर  होतं. महिलेला शेजाऱ्यासोबत नको ते करताना मुलाने पाहिलं. त्यानंतर मुलाने या प्रेमप्रकरणाला विरोध केला. पण महिला मद्यधुंद अवस्थेत असल्याने तिनं मुलाचं काहीही ऐकलं नाही. मुलावर वैतागलेल्या या महिलेनं तिच्या मुलाच्या हत्येचा कट रचला. 

हे वाचलं का?

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?

महिलेनं तिच्या 24 वर्षांच्या मुलाची हत्या केली. कारण मुलाने त्याच्या आईला शेजाऱ्यासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. संतु कुमार असं मृत तरुणाचं नाव आहे. तो तरुण छतौनी पोलीस स्टेशन हद्दीतील बरियापूर येथे राहत होता. संतूला त्याच्या आईच्या प्रेमप्रकरणावर संशय होता. कारण सोसायटीत तिच्याबाबत लोकांनी वेगवेगळ्या चर्चा रंगवल्या होत्या. पण संतुने जेव्हा स्वत:च्या डोळ्यांनी हे सर्व पाहिलं, तेव्हा त्याला प्रचंड राग आला. तो घरी पोहोचला तेव्हा त्याची आई नितेशसोबत नको ते करत होती. तो नजारा पाहून संतूच्या पायाखालची जमिनच सरकली. त्याने नितेशला खेचलं आणि त्याला मारहाण केली.

हे ही वाचा >> Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...

दोघांनीही संतुच्या हत्येचा कट रचला आणि...

याचदरम्यान, त्या महिलेनं नितेशची साथ दिली. आई-मुलामध्ये वादविवाद वाढला. तुला लाज नाही वाटत का..मी तुझा मुलगा आहे..हे काय करत आहे? असं तो मुलगा त्याच्या आईला म्हणाला. तेव्हा नितेशने संतुला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासानुसार, संतुची आई आणि नितेशने मिळून संतुच्या हत्येचा कट रचला. नितेशने संतुचा गळा दाबून खून केला. संतू ओरडत होता, पण त्याच्या आईने त्याला मदत केली नाही.

तर रुमचा दरवाजा बंद केला. जेणेकरून कोणीही त्याला वाचवायला येणार नाही. त्यानंतर संतुचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक लोकांना संतु गायब झाल्याचं सशय आला आणि त्यांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी बरियारपूर वॉर्ड नंबर 44 मधून शंतुचा मृतदेह ताब्यात घेतला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की, संतुची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. 

हे ही वाचा >> श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांसाठी खुशखबर! 24 कॅरेट सोनं पुन्हा गडगडलं..वाचा आजचे ताजे भाव

    follow whatsapp