Minor Girl Rape Crime News : उत्तरप्रदेशच्या हमीरपूर येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. येथील मुस्करा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत नराधम विद्यार्थ्याने चौथीत शिकणाऱ्या मुलीवर बाथरूममध्ये बलात्कार केला. पीडित मुलगी घरी पोहोचल्यावर तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याचं कुटुंबियांनी पाहिलं. त्यानंतर पीडितेनं घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत कुटुंबियांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
ADVERTISEMENT
पीडितेनं कुटुंबियांना सांगितलं की, शाळेतीलच एका विद्यार्थ्याने तिला बाथरूममध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. तिला मुलाचं नाव माहित नाही, पण समोर आला तर ती त्या नराधमाला ओळखेल, अशी माहिती पीडितेनं घरच्यांना दिली. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसानंतर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. दरम्यान, कुटुंबियांनी शाळा संस्थापकांनी घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज डिलिट केल्याचा आरोपही केला आहे.
हे ही वाचा >> पुण्यात खळबळ! पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक!
नराधमाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली..
पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय की, त्यांची आठ वर्षांची मुलगी कस्बेतील एका शाळेत दोन वर्षांपासून शिक्षण घेते. 25 जुलै रोजी मुलगी घरी परतली, तेव्हा तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. तपासादरम्यान तिने सांगितलं की, शाळेतील मुलाने तिला बाथरूममध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. कोणाला काही सांगितंल तर जीवे मारेन, अशी धमकीही नराधमाने दिली होती. त्याच दिवशी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना घडलेल्या प्रकाराबाबत आणि शाळेतील कॅमेरे चेक करण्यासाठी सांगण्यात आलं.
पंरतु, कॅमरे खराब असल्याचं शाळा प्रशासनाने सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत गेल्यावर तपासणी केली तर घटनेच्या दिवशीचं फुटेज डिलिट करण्यात आलं होतं. शाळेतील स्टाफमधील एखादा सदस्य यात सामील असल्याचा आरोप केला जात आहे. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने केलेले आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. सीओ राठ राजीव प्रताप सिंह यांनी म्हटलंय की, संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. अज्ञाता विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंची मातोश्रीकडे पावलं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार... नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
