Latur Rape Crime : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एचआयव्ही बाधित असलेल्या एका तरुणीवर दोन वर्षांपर्यंत बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. ही धक्कादायक घटना एका बाल आश्रय गृहात घडली असून पीडित तरुणीचा जबरदस्ती गर्भपात करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीनं धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, या घटना हासेगाव येथील एचआयव्ही संक्रमित मुलांच्या आश्रय गृहात 13 जुलै 2023 ते यावर्षी 23 जुलै दरम्यान घडल्या.
ADVERTISEMENT
अधिकाऱ्यांनी पीडितेला मदत केली नाही, पत्रही फाडलं..
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, ती मागील दोन वर्षांपासून या संस्थेत होती. बालगृहाच्या एका कर्मचाऱ्याने तरणीवर चारवेळा अत्याचार केला. नराधमाने या घटनेबाबत कोणालाही न सांगण्याची पीडित तरुणीला धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे संस्थेतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी पीडितेला कोणतीही मदत केली नाही. अधिकाऱ्यांना जे पत्र लिहिलं होतं, ते ही फाडून टाकण्यात आलं होतं.
हे ही वाचा >> Mithi River: मुंबईकरांनो, तुमच्या मिठी नदीचं मरण उघड्या डोळ्यांनी पाहा! मुंबई Tak ची 'ही' डॉक्यूमेंट्री तुम्हाला टाकेल हादरवून!
जेव्हा पीडित तरुणी आजारी झाली, तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं. तेव्हा तपासात समोर आलं की, ती चार महिन्यांची गर्भवती आहे. यानंतर आरोपींनी तिच्या सहमतीशिवाय एक डॉक्टरच्या माध्यमातून गर्भपात केला. दरम्यान, याप्रकरणी ढोकी पोलिसांनी सहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संस्थेचे संस्थापक आणि अधीक्षक, अत्याचार करणारे कर्मचारी आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा समावेश आहे.
मुंबईतही घडली बलात्काराची घटना
मुंबईच्या मुलुंड येथे अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी आणि दोन भावांसह एका ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. नराधमांनी पीडित तरुणीवर 11 महिने अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: महापालिकेकडून 'या' पदांवर भरती होणार! 56 हजार रिक्त जागा अन् लाड-पागे समिती...
ADVERTISEMENT
