Shocking Love Affair Viral News : मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्यात एक धक्कादायक घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील एका भाऊजीने त्याची मेव्हणी आणि साडूच्या दोन लहान मुलांची हत्या केली. सायकल देण्याच्या बहाण्याने त्या मुलांना जंगलात नेलं आणि नंतर नराधम भाऊजीने दोघांचा खून केला. एकतर्फी प्रेमप्रकरणातून ही धक्कादायक घटना घडली. भाऊजी त्याच्या मेव्हणीवर प्रेम करत होता. पण त्या महिलेला हे सर्व आवडत नव्हतं. यामुळेच भाऊजी वेडापिसा झाला अन् त्याने मोठं कांड केलं.
ADVERTISEMENT
सुभाष वार्ड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमात वेडापिसा झालेल्या भाऊजीने मुलांना सायकल देण्याचं आमिष दाखवलं आणि त्यांना जंगलात नेऊन त्यांचा गळा कापला. पोलिसांनी 24 तासांच्या आत या हत्याप्रकरणाचा तपास लावला आणि मुख्य आरोपीला अटक केली. रिपोर्टनुसार, 30 वर्षांची पूजा ढाकरीया, जिने 8 वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. ती सिवनीमध्ये भाड्याने राहत होती. ती तिचे दोन मुलं 9 वर्षांचा मयंक आणि 6 वर्षांच्या दिव्यांश सोबत राहत होती. मोठा मुलगा इयत्ता चौथीत आणि लहान मुलगा दुसरीत शिक्षण घेत होता.
हे ही वाचा >> "पतीच नव्हे तर दीर आणि मेव्हणा सुद्धा रोज माझ्यासोबत..." पत्नीने सांगितलं सासरच्या मंडळींचं 'ते' घाणेरडं सत्य!
पूजाला याबाबत जराही कल्पना नव्हती की, तिचा भाऊजी तिच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करत होता. पोलीस तपासात समोर आलं की, भोजराम त्याची मेव्हणी पूजासोबत एकतर्फी प्रेम करत होता. पूजाचे दोन्ही मुलं त्याच्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत होते. भोजरामने आधीही पूजाच्या मुलांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्याची धमकी दिली होती. परंतु, कोणीही या गोष्टीला गांभीर्याने घेतलं नाही.
जंगलात नेऊन हत्या केली
15 जुलै 2025 च्या संध्याकाळी जवळपास 5.30 वाजता, भोजरामने मयंक आणि दिव्यांशला नवीन सायकल देण्याचं आमिष दाखवलं. तो दोन्ही मुलांना घसियारी चौकातून ऑटोमध्ये बसवून जनता नगर चौकला घेऊन गेला. तिथे त्याला त्याचा मित्र शुभम भेटला आणि दोन्ही मुलांना बाईकवर बसवून सिवनी कटंगी मार्गावर अंबाबाई जंगलाकडे घेऊन गेला. त्यानंतर भोजरामने धारदार चाकूने दोन्ही मुलांचा गळा कापून हत्या केली.
हे ही वाचा >> बाईईई...नको ते सोनं! दोन दिवसांपूर्वी स्वस्त झालेलं सोनं आज प्रचंड महागलं, 24 कॅरेटचे भाव वाचून घामच फुटेल
त्यानंतर मृतेदह जंगलात लपवून दोन्ही आरोपी फरार झाले. त्यानंतर पूजाने मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं तपास केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं ऑटो चालकाला पकडलं. त्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला आणि आरोपी भोजरामने त्याचा गुन्हा कबूल केला.
ADVERTISEMENT
