Crime News : छत्तीसगडमधील विलासपूरमध्ये एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासूनेच दोन व्यक्तींना हाताशी घेऊन आपल्या जावयाचा काटा काढला आहे. संबंधित प्रकरणाचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. जावई आपल्या लेकीला सतत मारहाण करायचा, तिचा छळ करायचा याच रागातून सासूने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : विकृतीचं टोक! अल्पवयीन मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवले, नंतर कोंबडीचाच घेतला किस, मुंबईच्या घाटकोपरमध्ये काय घडलं?
नेमकं काय घडलं?
जावयाने केलेल्या कृत्यावर सासू नाराज झाल्याने तिनं टोकाचं पाऊल उचलून जावयाचा खेळ खल्लास केला. तिने दोन कॉन्ट्रॅक्ट किलरना कामावर ठेवलं. त्यानंतर तिने एक 1 लाख रुपये देऊन तिच्या जावयाला सुपारी देऊन ठार केलं. सध्या आरोपीसह सासूला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस पुढील अधिकचा तपास करत आहेत.
गुढ उकलण्यासाठी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
संबंधित प्रकरणातील गुढ उकलण्यासाठी पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले. त्यानंतरच हे गूढ उकललं गेलं आहे. हे प्रकरण सिरगिट पोलीस ठाणे हद्दीत घडल्याची माहिती समोर आली आहे. जावयाचा मृतदेह हा कालिकानगर टिफ्रा येथे आढळला. त्याची ओळख पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, तपास सुरु झाल्यानंतर असे आढळून आले की, हा मृतदेह 24 वर्षीय जावई साहिल कुमार पटेलचा आहे. तो जंजगीर चंपा जिल्ह्यातील बालोदा पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, या झालेल्या खुन्याबाबत कोणाला कसलाही सुगावा लागू दिला गेला नाही.
हेही वाचा : 'माझा नवरा तर पलंगावरून खाली...' पत्नीला दिरासोबत एका खोलीत पाहिलं अन् जाब विचारताच घडलं 'असं' की...
या झालेल्या खुनाचे पोलिसांनी गुढ उकललं आहे. याप्रकरणात एसपींनी एक अनुभवी पथक स्थापन केलं, या पथकाचे नेतृत्व करणारे एसपी रजनेश सिंहांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीला दारूचं व्यसन होतं आणि तो व्यक्ती दारू पिऊन पत्नीला मारहाण करत होता. याचमुळे पत्नी नेहमी घडलेली घटना आपल्या आईला सांगायची. यातून कंटाळलेल्या सासूने टोकाचं पाऊल उचलून आपल्या जावयालाच संपवलं.
ADVERTISEMENT
