मुंबई: काय हा प्रकार? अविवाहित पुरूष कोंबड्यासोबत अश्लील चाळे करायचा, शेजारी राहणाऱ्या 10 वर्षांच्या मुलासोबत तर...
Mumbai Crime : मुंबईतील बोरीवली पश्चिमेकडे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मध्यमवयीन व्यक्तीने आपल्या कोंबडीसोबतच एका निष्पाप मुलासोबत गैरकृत्य केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईत धक्कादायक प्रकार

मध्यमवयीन व्यक्तीने आपल्या कोंबडीचा घेतला किस

नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : मुंबईतील बोरीवली पश्चिम येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मध्यमवयीन व्यक्तीने आपल्या कोंबडीसह एका निष्पाप मुलासोबत गैरकृत्य केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. संबंधित नराधमाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा : गजलक्ष्मी राजयोगामुळे 'या' राशीतील लोकांना लागली लॉटरी, आयुष्यात झाली सुखाची भरभराट
नेमकं काय घडलं?
या घडलेल्या घटनेच्या प्रकरणात ही तक्रार 48 वर्षीय मेकअप आर्टिस्टने दाखल केली आहे. संबंधित तक्रारदार हा त्याची पत्नी, मुलगी आणि दहा वर्षाच्या मुलासोबत राहत होता. ही घटना 22 जून रोजी घडली होती. आरोपी हा त्याच्याच शेजारील पहिल्या मजल्यावर राहत होता.
त्याने पाहिलं की संबंधित अविवाहित व्यक्ती हा पाळीव कोंबडीचे चुंबन घेत होता. त्यानंतर त्याने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हे चित्र तक्रारदाराने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं. हा व्हिडिओ त्याने आपल्या पत्नीला दाखवला असता, तेव्हा त्यांचा दहा वर्षांचा मुलगाही तिथंच उभा होता. त्याच्या मुलाने व्हिडिओ पाहून मोठा दावा केला की, आई हाच व्यक्ती मला अश्लील व्हिडिओ दाखवायचा. याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती.
हेही वाचा : Maharashtra Weather: कोकणात पावसाची परिस्थिती कायम, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात 'असं' असेल हवामान
या प्रकरणाचा जेव्हा खुलासा झाला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सुरूवातील पीडिताने भयभीत होऊन पोलीस ठाण्यात तक्रार करणं टाळलं. त्यानंतर त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने मंगळवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बुधवारी बोरीवली पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. भारतीय न्यायसंहितेच्या कलमान्वये 351(2) पोक्सो कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.