अलिगढ: उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये एका तरूणीने एका व्यापाऱ्याशी अनैतिक संबंधि ठेवून त्याला आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने ब्लॅकमेल केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मेकअप आर्टिस्ट असलेल्या या तरुणीने दुबईहून येऊन तिच्या नव्या प्रियकरासह जुन्या बॉयफ्रेंडला हनीट्रॅप अडकवलं. मुलीने आणि तिच्या जोडीदाराने प्रथम अश्लील व्हिडिओ बनवले आणि नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची मागणी केली. पण आता तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे आणि तुरुंगात पाठवले आहे.
ADVERTISEMENT
हॉटेलच्या खोलीत रचण्यात आला होता सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण एका बड्या व्यापाऱ्याशी संबंधित आहे, जो या हनीट्रॅपचा बळी ठरला. मेकअप आर्टिस्ट तरुणीने तिच्या जुन्या प्रियकराला (व्यापारी) मथुरा येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावं.
हे ही वाचा>> वहिनीला लागलेली अनैतिक संबंधाची चटक, बेडरूममध्ये दिराच्या मिठीत अन् पतीची अचानक एंट्री
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, संपूर्ण कट हॉटेलच्या खोलीत आधीच रचला गेला होता. खोलीत गुप्त कॅमेरे बसवले होते. जेव्हा व्यापारी हॉटेलमध्ये आला त्यानंतर त्याचे आणि संबंधित तरुणीचे शारीरिक संबंध झाले. पण याच वेळी त्यांच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ हे गुप्त कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाले होते.
...नंतर सुरू झालं ब्लॅकमेलिंग
दरम्यान, व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर आरोपीने व्यापाऱ्याला तात्काळ ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आधी 5 लाख रुपयांची मोठी रक्कम आणि नंतर 7 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. व्यापाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीने ते अश्लील व्हिडिओ त्याच्या भावाला आणि पत्नीला पाठवले.
हे ही वाचा>> Mumbai: '40 वर्षांच्या मॅडमसोबत मुलाचे शारीरिक संबंध हे त्याच्या आई-वडिलांना माहिती होतं', समोर आली भलतीच गोष्ट
पीडित व्यापाऱ्याने याप्रकरणी तात्काळ डीएसपी सर्वम सिंह यांची भेट घेतली आणि आपली संपूर्ण व्यथा सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून डीएसपींनी क्वार्सी पोलीस ठाण्याला चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. कारवाई करत पोलिसांनी आरोपी मेकअप आर्टिस्ट तरूणी आणि तिच्या नवीन प्रियकराला अटक तात्काळ केली. दोघांनाही आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
