Nagpur Crime : पैसा हा फार वाईट असतो आणि त्यातल्या त्यात नात्यात पैशांचा व्यवहार आल्यानंतर वाद विकोपाला जातो. यामुळे अनेकदा पैशांमुळे नातं तुटतं. अशीच एक घटना नागपूरात घडली आहे. पैशांच्या वादातून जावयाने आपल्याच सासूला भररस्त्यात ठार केलं आहे. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना कळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी आरोपी जावयाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस आता आरोपीची कसून चौकशी करताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mumbai Crime : शिक्षिका विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये घेऊन जायची अन् पाजायची दारू, ड्रग्ज नंतर...न्यायालयाचा धक्कादायक निर्णय
नेमकं प्रकरण काय?
घडलेल्या घटनेनुसार, मृत महिलेचं नाव माया पासेकर असे होते. तर ज्याने हा खून केलाय त्याचं नाव मुस्ताफा खान मोहम्मद मोहम्मद खान असे आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणाबाबत सांगितलं की, मायाने तिचा जावाई मुस्तफाकडून 5 लाखांची रक्कम उधार घेतली होती. मायाने पैसे देण्याबाबत कसलीही कृती दाखवली नाही. तिनं पैसे परत केलेच नाही, त्यानंतर या प्रकरणावरून दोघांध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच ही हत्या झाली आहे.
बुधवारी दोघांमध्ये पैशांवरून वादाला तोंड फुटलं होतं. यानंतर आरोपी मुस्तफाने हत्येचा कट रचला होता. प्रत्यक्षाचत त्याने धारदार चाकूची खरेदी केली होती. त्यानंतर दुपारच्या वेळी त्याने आपल्या सासूचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याची सासू कामावरून परतत असताना, रस्त्याच्या मध्यभागी जावई मुस्ताफाने तिच्या मानेवर चाकूने सपासप वार केले. त्यात तिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला होता.
हेही वाचा : पतीला बघितलं मेहुणीसोबत फिरताना, पत्नीची सटकली अन् थेट हेल्मेटनंच...व्हिडिओ व्हायरल
प्रकरण सीसीटीव्हीत कैद
संबंधित घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, सध्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओत आरोपी कसा गुन्हा करतो आणि घटनास्थळावरून पळून जातो हे त्यात दिसून येत आहे. संबंधित प्रकरणाचा नागपूरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खून करणारा आरोपी मुस्ताफाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
