Mumbai: '40 वर्षांच्या मॅडमसोबत मुलाचे शारीरिक संबंध हे त्याच्या आई-वडिलांना माहिती होतं', समोर आली भलतीच गोष्ट

मुंबई तक

Mumbai Crime : मुंबईतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका 40 वर्षीय शिक्षिकेला पोक्सो कायद्यांतर्गत जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षिकेकडूनच विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण

point

न्यायालयाने आरोपी शिक्षिकेचा जामीन केला मंजूर

Mumbai Crime : मुंबईतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका 40 वर्षीय शिक्षिकेला पोक्सो कायद्यांतर्गत जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यांपासून मुंबईतील प्रतिष्ठीत शाळेतील ही धक्कादायक घटना आहे. एका इंग्रजी शिक्षिकेला एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून अटक केली होती. त्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू आणि ड्रग्ज दिलं होतं, असा आरोप करण्यात आला. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत सांगितलं की, शिक्षिकेने सुमारे एक वर्षे अल्पवयीन विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नेलं आणि लैंगिक शोषण केलं आहे. 

हेही वाचा : मुंबई हादरली! बापासह दोन भावांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले, तब्बल...महिने भयंकर कृत्य

गुन्ह्यानंतर महिला शिक्षिकेला जामीन मंजूर

गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाच महिन्यात महिला शिक्षिकेला जामीनही मंजूर झाला आहे. मंगळवारी विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सबिना मलिक यांनी जामीन अर्ज स्वीकारला. त्यानंतर सुनावणीच्यादरम्यान, दोन्ही वकिलांनी असा युक्तीवाद करत मुलाच्या आईच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचा युक्तीवाद केला. शिक्षकाच्या वकिलांनी सांगितलं की, दोघांच्या नात्याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती होतं, असा गलिच्छ युक्तीवाद वकिलांनी केला. मुलाच्या भावना आणि कृत्य हे एफआरआयमध्ये जाणूनबुजून लपवण्यात आल्याचं युक्तीवादाररम्यान वकिलांनी सांगितलं. 

पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी शिक्षिका डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान, संबंधित 16 वर्षीय विद्यार्थ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये शिक्षिकेनं पहिल्यांदाच त्याच्याशी शरीरसंबंध ठेवले होते. 

एफआरआयनुसार, महिला अनेकदा मुलाला महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जायची, आणि विद्यार्थ्याला दारू पाजून त्याचे शोषण करायची. शिक्षिकेनं पुन्हा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थ्याने आपल्या पालकांना आपला वाईट अनुभव सांगितला. त्यानंतर त्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp