मुंबईची खबर: महापालिकेकडून 'या' पदांवर भरती होणार! 56 हजार रिक्त जागा अन् लाड-पागे समिती...
महापालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महापालिकेतील विविध खात्यांतील 56 हजार रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई महापालिकेकडून नव्या भरतीची माहिती

महापालिका प्रशासनाकडून 56 हजार रिक्त पदांवर भरती...
Mumbai News: मुंबई महापालिकेकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये रिक्त जागांसाठी भरती निघते. अशातंच, याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई महापालिकेतील विविध खात्यांतील 56 हजार रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना यासंदर्भातील आश्वासन दिलं. महापालिका प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
रिक्त जागांवर भरती
महापालिकेतील विविध खात्यांमध्ये बरेच कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. शुक्रवारी डॉ. जोशी यांच्या दालनात महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबात बैठक पार पडली. यामध्ये विविध खात्यातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. या बैठकीत मुंबई महापालिका अंतर्गत विविध खात्यांमधील रिक्त जागांवर भरती करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं.
हे ही वाचा: Govt Job: Oil India मध्ये नोकरीची संधी! किती मिळेल पगार? त्वरीत करा अर्ज...
लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार...
राज्य सरकारच्या धोरणानुसार, मलनिस्सारण, गटारे, स्मशानभूमी, सफाई अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकऱ्या दिल्या जाणार असल्याचं जोशी यांनी बैठकीमध्ये सांगितलं. विविध खात्यांतील 56 हजार रिक्त पदांवर भरती करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा अतिरिक्त आयुक्तांकडून देण्यात आली. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापरेकर यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले.
हे ही वाचा: 14 वर्षांचा मुलगा..13 जणांनी गँगरेप केला अन्...नग्न अवस्थेत मृतदेह पाहून पोलिसही हादरले! घडलं तरी काय?
कर्मचाऱ्यांची बदली
सफाई खात्याच्या पी.टी.केस विभागातील तीन लिपिक आणि केईएम रुग्णालयात 26 वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले. तसेच, एका जागी अनेक वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात पुढाकार घेण्यात आला आहे. या बदलीच्या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी प्रशासनाने मान्य केली असल्याची माहिती डॉ. बापरेकर यांनी दिली. याव्यतिरिक्त, नवीन पेन्शन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील दोन वर्षांपासून रखडलेले डीसी-1 देय दावे निकाली काढण्यासाठी सुधारित आणि सोपी नियमावली तयार करुन लवकरच प्रसारित केली जाणार असल्याचं देखील जोशी यांनी सांगितलं.