मुंबईची खबर: दुचाकी चालकांना ई-चलानचा सर्वाधिक फटका! 'इतक्या' वाहनांवर झाली कारवाई...
मुंबईत सुमारे 48 लाख वाहने असून त्यात प्रवासासाठी दुचाकींचा सर्वाधित वापर असल्याचं सांगितलं जातं. तसेच, मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलानद्वारे केलेल्या दंडात्मक कारवाईतून शहरात दुचाकी चालवणारे चालक सर्वात बेशिस्त असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील दुचाकी चालकांना ई-चलानचा फटका

'इतक्या' वाहनांवर झाली कारवाई
Mumbai News: मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याचं पाहायला मिळतं. शहरातील नागरिक व्यावसायिक तसेच वैयक्तिक कामांसाठी वाहनांचा वापर करतात. वाहतूक पोलीस आकडेवारीनुसार, मुंबईत सुमारे 48 लाख वाहने असून त्यात प्रवासासाठी दुचाकींचा सर्वाधित वापर असल्याचं सांगितलं जातं. तसेच, मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलानद्वारे केलेल्या दंडात्मक कारवाईतून शहरात दुचाकी चालवणारे चालक सर्वात बेशिस्त असल्याचं समोर आलं आहे.
यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांतील चलान कारवाईत दुचाकीचालकांची संख्या जास्त असल्याचं समोर आलं आहे. 2024 च्या रिपोर्ट्सनुसार, वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या एकूण 67 लाख 84 हजार 925 वाहनचालकांवर ई-चलानद्वारे कारवाई करण्यात आली आहे. त्यातील 30 लाख 34 हजार 889 अर्थात 43.57 टक्के चलान दुचाकीचालकांनी वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल जारी केले आहेत.
रस्त्यांवर धावतात सर्वाधित दुचाकी..
रिपोर्ट्सनुसार, मुंबईत सुमारे 29 लाख दुचाकी असून दररोज रस्त्यांवर एकूण वाहनांपैकी 75 टक्के या दुचाकी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, दररोज दिवसभरात रस्त्यांवर 21 ते 22 लाख दुचाकी धावतात.
हे ही वाचा: Govt Job: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा...
वाहतूक तज्ज्ञांचं मत...
वाहतूक तज्ज्ञ ए.व्ही. शेनॉय यांच्या मते, सिग्नल मोडणे, विरुद्ध मार्गिकेचा वापर करणे आणि नो एंट्रीत शिरणे अशाप्रकारे नियमभंग करुन दुचाकीस्वार स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात.
दररोज शहरातील रस्त्यांवर 21 ते 22 लाख दुचाकी..
दररोज 21 ते 22 लाख दुचाकी शहरातील रस्त्यांवर धावत असतात. विशेषत: ठाणे, नवी मुंबई आणि मिरा रोड मधून दररोज 8 ते 10 वाहने शहरात येतात. मुंबईत दुचाकींची संख्या जास्त असल्याकारणाने रस्त्यांवर दुचाकी सर्वाधित धावतात. वाहतूक पोलिसांच्या दृष्टीने दुचाकी थांबवणं सोपं आहे.
हे ही वाचा: शिक्षक विद्यार्थिनींच्या वॉशरूममध्ये डोकवायचा अन्...पिंपरी चिंचवडच्या शाळेत नेमकं काय घडलं?
खरंतर, विनाहेल्मेट दुचाकीचालक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात किंवा पोलिसांना सहजपणे दिसतात. याच कारणामुळे दुचाकी चालकांवर सर्वाधित कारवाई होत असते. दुचाकींचे सर्वात जास्त अपघात होत असून त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांमध्ये कारचालक दुसऱ्या क्रमांकावर असून रिक्षाचालकांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.