Govt Job: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पगाराचा आकडाही जबरदस्त... नका सोडू संधी
बँक ऑफ बडोदा (BOB) कडून विविध व्यवस्थापकीय (मॅनेजेरियल) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
व्यवस्थापकीय (मॅनेजेरियल) पदांसाठी भरती जाहीर
Govt Job: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) कडून विविध व्यवस्थापकीय (मॅनेजेरियल) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 23 जुलै 2025 रोजी सुरू झाली आहे.
बँक ऑफ बडोदाच्या या भरतीअंतर्गत एकूण 41 रिक्त जागा भरण्यात येतील. या पदांवर अर्ज करु इच्छिणारे उमेदवार 12 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
'या' पदांसाठी भरती
- मॅनेजर (डिजिटल प्रोडक्ट): 7 पद
- सीनिअर मॅनेजर (डिजिटल प्रोडक्ट): 6 पद
- फायर सेफ्ट ऑफिसर: 14 पद
- मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी): 4 पद
- सीनिअर मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी): 4 पद
- चीफ मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी): 2 पद
- मॅनेजर (स्टोरेज एडमिन अॅण्ड बॅकअप): 2 पद
- सीनिअर मॅनेजर (स्टोरेज एडमिन अॅण्ड बॅकअप): 2 पद
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी रिक्त पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून उमेदवार भरतीच्या नोटिफिकेशनवर जाऊन यासंदर्भात अधिक माहिती तपासू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदानुसार शैक्षणिक पात्रता असणं अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पदानुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून यामध्ये किमान 22 आणि कमाल 40 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.










