14 वर्षांचा मुलगा..13 जणांनी गँगरेप केला अन्...नग्न अवस्थेत मृतदेह पाहून पोलिसही हादरले! घडलं तरी काय?

मुंबई तक

Shocking Murder Case Viral News :  नवी दिल्लीच्या समयपूर परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. येथील एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाची 24 वेळा चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

ADVERTISEMENT

नवी मुंबई हत्या प्रकरण
Shocking Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलावर गँगरेप करून त्याची हत्या केली

point

पोलिसांना नात्यात सापडला नग्न अवस्थेत असलेला मृतदेह

point

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?

Shocking Murder Case Viral News :  नवी दिल्लीच्या समयपूर परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. येथील एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाची 24 वेळा चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना नेमकी कुठे आणि का घडली? याबाबत जाणून घ्या.1 जुलै रोजी पोलिसांना एक पीसीआर कॉल आला होता. एका नाल्यात मुलाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना नग्नअवस्थेत असलेला मृतदेह सापडला. त्याच्या गळ्यात एक स्कार्फ बांधला होता. शरीरावर अनेक ठिकाणी चाकूचे घाव होते. सुरुवातीला हे प्रकरण हत्येचं असल्याचं वाटत होतं. पण पोस्टमार्टम रिपोर्टने धक्कादायक माहिती समोर आणली. रिपोर्टमध्ये उघडकीस आलं की, मुलाच्या शरीरावर चाकूचे 24 निशाण होते आणि त्यांचं लैंगिक 
शोषण करण्यात आलं होतं. 

हे ही वाचा >> "पतीच नव्हे तर दीर आणि मेव्हणा सुद्धा रोज माझ्यासोबत..." पत्नीने सांगितलं सासरच्या मंडळींचं 'ते' घाणेरडं सत्य!

6 अल्पवयीनसह 13 लोकांचा समावेश

याप्रकरणात पोलिसांनी 13 लोकांना आरोपी केलं आहे. यामध्ये 6 अल्पवयीन आहेत. पोलिसांच्या तपासात समोर आलं की, मुख्य आरोपी कृष्णा उर्फ भोला (19) ला संशय होता की, पीडित मुलाने दिवाळी दरम्यान त्याच्यावर हल्ला करणाऱ्या मुलांना त्याच्याविषयी माहिती दिली होती. याचाच बदला घेण्यासाठी कृष्णाने त्याच्या मित्रांसोबत मिळून निर्घृण हत्येचा कट रचला. 29-30 जूनच्या रात्री आरोपी वीर चौक बाजारात पोहोचले. तेथून त्या मुलाचं मित्रांच्या समोर अपहरण केलं. तिथे त्याचे कपडे काढले आणि नंतर त्याचं लैंगिक शोषण केलं गेलं. त्यानंतर चाकूने वार करत त्याची हत्या केली. 

हे ही वाचा >> "पतीच नव्हे तर दीर आणि मेव्हणा सुद्धा रोज माझ्यासोबत..." पत्नीने सांगितलं सासरच्या मंडळींचं 'ते' घाणेरडं सत्य!

हत्येनंतर कांवड यात्रेत सहभागी

पोलिसांना खबर मिळाली की, हत्येनंतर काही आरोपी हरिद्वारला पळून गेले होते आणि कांवड यात्रेत सामील झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्याच प्लॅन केला. त्या ठिकाणाहून इतर तीन आरोपींना मोनू आणि दोन अल्पवयीनला अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला. तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp