कित्येक महिन्यांपासून अत्याचार, गरोदर राहिली अन् नराधमांनी जिवंतच... अल्पवयीन मुलगी ठरली वासनेची बळी!

मुंबई तक

ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यातून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिला जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

कित्येक महिन्यांपासून अत्याचार, गरोदर राहिली अन् नराधमांनी जिवंतच...
कित्येक महिन्यांपासून अत्याचार, गरोदर राहिली अन् नराधमांनी जिवंतच...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेची बळी

point

कित्येक महिन्यांपासून बलात्कार अन् राहिली गरोदर

point

अल्पवयीन मुलीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न

Gang Rape Case: ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिला जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या. 

अल्पवयीन मुलीला वासनेची बळी बनवलं

ओडिशातील बनशबारा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता या गावाची रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. गावाजवळील एका मठात काम करणाऱ्या भाग्यधर दास आणि पंचानन दास या दोन्ही भावांची तसेच तुलू बाबू नावाच्या त्यांच्या मित्राची अल्पवयीने पीडितेवर घाणेरडी नजर होती. या तीन आरोपींनी मिळून त्या अल्पवयीन निष्पात मुलीवर वारंवार बलात्कार केला. सतत अत्याचार होत असून सुद्धा पीडिता लाजेमुळे घाबरुन गप्प राहिली मात्र, नराधमांची वासना दिवसेंदिवस वाढत जात होती. 

हे ही वाचा: "पतीच नव्हे तर दीर आणि मेव्हणा सुद्धा रोज माझ्यासोबत..." पत्नीने सांगितलं सासरच्या मंडळींचं 'ते' घाणेरडं सत्य!

पीडितेला जिवंत गाडण्याचा प्रयत्न 

काही काळानंतर अल्पवयीन पीडिता गरोदर राहिली आणि आरोपींना हे कळताच ते घाबरले. आपला गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी मोठा आणि भयानक कट रचला. मुलीला जिवंत गाडलं तर आपला गुन्हा कायमस्वरुपी लपून राहिल, असा विचार त्या नराधमांच्या मनात आला. एके दिवशी रात्रीच्या वेळी आरोपी पीडितेला घेऊन एका निर्जनस्थळी गेले आणि तिथे जमिनीत त्या मुलीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुदैवाने अल्पवयीन पीडिता कशीबशी वाचून बाहेर पडली आणि घरी येऊन तिने तिच्या कुटुंबियांना घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल सांगितलं. 

हे ही वाचा: तरूणी दुबईहून आली जुन्या बॉयफ्रेंडला म्हणाली, 'हॉटेलवर ये...' रूममध्ये नको ते करून बसला...

बऱ्याच काळापासून लैंगिक शोषण

पीडितेच्या वडिलांनी त्वरीत कुजंग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि भाग्यधर दास आणि पंचानन दास यांना अटक केली. तसेच, तुलू बाबू या तिसऱ्या आरोपीचा शोध अजूनही सुरू आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी मठात काम करत असून बऱ्याच काळापासून मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

पीडितेला जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जिथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी तिची प्रकृती विचारात घेऊन योग्य उपचार सुरू केले. पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp