पत्नीचं प्रेम हवं होतं म्हणून काकाने पुतण्याचं काळीजच चिरलं आणि गेला मांत्रिकाकडे...

मुंबई तक

Crime News : एका 6 वर्षाच्या मुलालाच्याच काकांनी पुतण्याचं काळीज काढलं आणि ठार मारले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जलद तपास करत प्रकरणाचा मोठा खुलासा केला आहे. 

ADVERTISEMENT

crime news superstition uncle killed nephew
crime news superstition uncle killed nephew
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काकानेच पुतण्याचं काळीज काढून ठार केलं

point

धक्कादायक कारण आलं समोर

Crime News : श्रद्धा असणं यात काहीही गैर नसतं. मात्र, अनेकदा मांत्रिकांंचं ऐकून आपण बकऱ्याचे अनेकदा बळी दिलेले आहेत. पण आता मांत्रिक तांत्रिकाच्या सांगण्यावरून एका व्यक्तीने आपल्याच पुतण्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना खैरथल जिल्ह्यातील मुंडावर येथे उघडकीस आली. एका 6 वर्षाच्या मुलाच्याच काकांनी पुतण्याचं काळीज काढलं आणि ठार मारले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जलद तपास करत प्रकरणाचा मोठा खुलासा केला आहे. 

हेही वाचा : नागपूर हादरलं! जावयाने आपल्याच सासूवर भररस्त्यात धारदार चाकूने केले सपासप वार, कारण ऐकून चक्रावून जाल

नेमकं घडलं काय? 

खैरथल जिल्ह्यातील सराई कला गावात वय 6 वर्षे असणाऱ्या एका निष्पाप मुलाची हत्या करण्यात आली. संबंधित हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. खून करण्यात आलेल्या निष्पाप मुलाचं नाव लोकेश असं आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, लोकेशची हत्या त्याच्याच काकांनी केली आहे. एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून काकाने आपल्या पुतण्याची हत्या केली आहे. तांत्रिकाने काकाला निष्पाप मुलाचा बळी घेऊन त्याचं रक्त आणि काळीज आणण्यास सांगितलं. संबंधित प्रकरणात आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.  

मुंडावर येथील एसएचओ महावीर सिंह यांनी सांगितलं, आरोपी मनोज आपल्यापासून वेगळ्या झालेल्या पत्नीला परत आणण्यासाठी एका तांत्रिकाकडे गेला होता. त्याने त्याला आपल्या मुलाचे रक्त आणि काळीज काढून आणण्यास सांगितलं. आपली पत्नी घरी येण्यापूर्वीच लोकेशची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर त्याने मुलाचा मृतदेह हा रिकाम्या घरातील गवताच्या पातेखाली लपवून ठेवला होता. 

पोलिसांनी सांगितलं, मनोजची पत्नी त्याच्यापासून वेगळी झाली होती. तिनं परत येण्यास नकार दिला होता. निराश होऊन मनोजने तांत्रिक सुनील कुमारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तांत्रिकाने मनोजला सांगितलं की, आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी एक विधी करावा लागेल. माणासचं रक्त आणि काळीज आवश्याक असेल असं त्याला सांगितलं. एवढंच नाही,तर त्या मांत्रिकाने तब्बल 12 हजार रुपयांची मागणी केली. 

काकानेच पुतण्याचा केला खून

त्यानंतर पोलीस पुढे म्हणाले की, शनिवारी दुपारी मनोज लोकेशने मुलाला चॉकलेट खायला दिलं होतं. त्यानंतर त्याला एका मोडकळीस आलेल्या घरात नेलं आणि त्याची हत्या करण्यात आली होती. शरीरावर जखमांच्या खुणा आणि सुईने टोचण्यात आलेल्या अनेक खुणा झाल्या होत्या, यावरून रक्त काढण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. 

हेही वाचा : मुंबई हादरली! बापासह दोन भावांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले, तब्बल...महिने भयंकर कृत्य

मनोजने स्वत:ला निर्दोष म्हणून दाखवण्यासाठी घटनास्थळी राहून पोलिसांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी केलेल्या कठोर चौकशी आणि तपासानंतर प्रकरण उघडकीस आलं. चौकशीदरम्यान, त्याने तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा  केल्याचं मान्य केलंय. संबंधित प्रकरणात तांत्रिक मांत्रिक सुनील कुमारच्या मुसक्या आवळल्या आहेत. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp