Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाचा कहर, 15 जिल्ह्यांना मोठा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा हवामानात मोठा बदल घडणार असल्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेचं सावट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात पुन्हा हवामानात मोठा बदल

point

काही भागांमध्ये पावसाचा कहर

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा हवामानात मोठा बदल घडणार असल्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेचं सावट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे 3 जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच 6 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

हे ही वाचा : वडिलांचं बायकोशी प्रेमसंबंधाचा संशय, लेकानं मोठं कांड केलं अन्..

कोकण 

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी केला नाही. मात्र, तरीही काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 25 मे रोजी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यात विभागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची अधिक शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची अधिक शक्यता आहे. 

हे वाचलं का?