पोलिसाच्या पत्नीने बहिणीला मोबाईलचा पासवर्ड पाठवला, अन् पुढे सर्वांची झोप उडाली
Crime News : हुंडाबळीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पती आणि सासरच्या छळाला कंटाळून 26 वर्षीय लक्ष्मी प्रियाने आत्महत्या केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलिसाच्या पत्नीने बहिणीला मोबाईलचा पासवर्ड पाठवला
अन् पुढे सर्वांची झोप उडाली
Crime News : एका 26 वर्षीय तरुणीने सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे. लक्ष्मी प्रिया असे या तरुणीचे नाव असून, 2023 मध्ये म्हैसूर येथील राजेश आराध्या याच्याशी तिचे लग्न झाले होते. राजेश हा बेंगळुरू येथील एचएएल पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. लग्नानंतर काही दिवसांतच पती राजेश, सासरा पलक्षा आराध्या आणि सासू भाग्याम्मा यांच्याकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला होता. हुंड्यावरून होणारा हा छळ इतका वाढला की तिला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा : विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून शिक्षिकेवर पेट्रोल ओतून जाळलं, एवढ्यावर न थांबता..
अखेरच्या क्षणी पाठवलेला मेसेज आणि पोलिसांची कारवाई
लग्नानंतर लक्ष्मी प्रियाने एका मुलीला जन्म दिला आणि प्रसूतीनंतर ती सुमारे सहा महिने आपल्या माहेरी राहिली होती. ती पुन्हा सासरी परतल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडत गेली. तिच्या मृत्यूच्या काही काळ आधी, 22 मे रोजी दुपारी 2:31 वाजता तिने आपल्या धाकट्या बहिणीला (जयश्रीला) तिच्या मोबाईलचा पासवर्ड व्हॉट्सअॅपवर पाठवला होता. हा मेसेज मिळताच कुटुंबीयांनी तिच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पती राजेशला संपर्क साधला असता त्याने लक्ष्मी प्रियाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
हेही वाचा : नर्सचा मर्डर करुन बॉडी रुग्णालयात आणून टाकली, सुफियानच्या एका हट्टामुळे भयंकर घडलं!









