ड्रग्स तस्कराचे फोटो भाजपच्या दिग्गज नेत्यांसोबत, फोनमध्ये मुलींचेही सापडले अश्लील फोटो

मुंबई तक

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये क्राइम ब्रांचच्या कारवाईदरम्यान, ड्रग्ज तस्करांविरुद्ध एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. नुकतंच अटक झालेल्या एका गुन्हेगाराचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणातील तस्कराच्या फोटोमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांचा समावेश
ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणातील तस्कराच्या फोटोमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांचा समावेश
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ड्रग्ज स्मगलिंग करणाऱ्या तस्कराचे भाजपच्या नेत्यांसोबत फोटोज

point

ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणाचं राजकीय कनेक्शन

Crime News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोपाळ क्राइम ब्रांचच्या कारवाईदरम्यान, ड्रग्ज तस्करांविरुद्ध एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. एका आठवड्यापूर्वी, भोपाळ क्राइम ब्रांचने दोन ड्रग्ज तस्करांना पकडले आणि याबाबतील बरेच खुलासे करण्यात आले.

 

तापासातील माहितीच्या आधारे, पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.  नुकतंच अटक झालेल्या एका गुन्हेगाराचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. नेमकं प्रकरण काय?

 

तस्करांना रंगेहाथ पकडलं

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास एक आठवड्यापूर्वी गोविंदपुरा भाजी मार्केटजवळ दोन संशयास्पद तरुण स्कूटी घेऊन उभे होते आणि एमडी ड्रग्जबद्दल बोलत होते. त्यानंतर पोलिसांना याबद्दल कळताच त्यांनी सैफुद्दीन आणि शाहरुख या दोन तरुणांना पकडले आणि आरोपींकडून 15.14 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे तीन लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या चौकशीत शाहवर आणि यासीन या दोन तरुणांची नावं समोर आली आणि या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

 

व्यवसायात मुलींचासुद्धा वापर

 

आरोपींनी त्यांचा ड्रग्ज व्यवसाय वाढवण्यासाठी मुलींचा वापर केला असल्याचं देखील पोलिस तपासात समोर आलं. यासाठी आरोपींनी आधी मुलींना ड्रग्जचं व्यसन लावलं आणि नंतर त्यांच्या माध्यमातून ड्रग्जची डिलिव्हरी करून घेतली. मुलींच्या मदतीने आरोपींना त्यांचा व्यवसाय वाढवायचा होता.

 

पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे

 

तपासादरम्यान, पोलिसांना बरेच पुरावे सापडले. आरोपीच्या मोबाईलमधून काही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून त्यात काही तरुणांना नग्नावस्थेत क्रूरपणे मारहाण केली जात आहे. याशिवाय, त्यांच्या मोबाईलमध्ये बऱ्याच महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा आहेत. तसेच चौकशीच्या आधारे अटक करण्यात आलेल्या यासीनचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे मध्य प्रदेशातील राजकारणही चांगलंच तापलं आहे.

 

हे ही वाचा: Mumbai Crime : शिक्षिका विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये घेऊन जायची अन् पाजायची दारू, ड्रग्ज नंतर...न्यायालयाचा धक्कादायक निर्णय

 

डीसीपी यांनी दिली माहिती...

 

या प्रकरणी डीसीपी शैलेंद्र सिंह चौहान म्हणाले की, गुन्हे शाखा ड्रग्जविरुद्ध सतत मोहीम राबवत असून या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे आणि एमडीवरही कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान, आरोपी यासीनच्या फोनमध्ये अनेक व्हिडिओ सापडले आहेत, तसेच तो काही लोकांना मारहाण करताना आणि धमकावतानाचे व्हिडिओ देखील समाविष्ट आहेत. संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.

 

हे ही वाचा: वहिनीच्या भांगेत भरलं सिंदूर अन् एकत्र घेतली धबधब्यात उडी... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

 

विरोधी पक्षाची टीका

  

आरोपी यासीनचा भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जितू पटवारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (X) वर यासीनसोबत भाजप नेत्यांचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, "विधानसभा क्षेत्रातून यासीनला 100 ग्रॅम ड्रग्जसह अटक! तो एका मोठ्या ड्रग्ज नेटवर्कशी जोडलेला असल्याचा संशय आहे! मुख्यमंत्री महोदय, तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी यासीनचे काही फोटो पोस्ट करत आहे. जर तुम्ही राज्यातील जनतेला उत्तर दिले तर सत्तेच्या समृद्ध संबंधांबद्दलचा आदर वाढेल!”

 

हे वाचलं का?

    follow whatsapp