Honeymoon झाला आणि पत्नी घेऊन आली दूध, पतीचा मूडचा बदलला; पण...
आग्रा येथील सचिनचे 4 जुलै रोजी कविता नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. लग्नानंतर 15 दिवसांनी त्याची पत्नी कविताने झोपण्यापूर्वी घरातल्या सर्वांना गुंगीचे पदार्थ मिसळलेले दूध दिले. त्यानंतर तिने एक भयंकर कृत्य केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर वधू पळून गेली

पत्नी परत येईल याची पती वाट पाहत राहिला

महिला सोबत दागिने आणि पैसे घेऊन गेली
आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. मोठी स्वप्ने आणि आशा घेऊन लग्न करणारा एक सामान्य माणूस. लग्नानंतर त्याने हनिमूनसाठी मोठी तयारीही केली होती. दुसरीकडे कुटुंबातील सदस्यांनीही वधूचे खूप चांगले स्वागत केले होते. तिला काय हवं-नको ते सर्व काही दिलं होतं. पण त्याच्यासोब जे घडलं त्याचा आपण विचारही करू शकत नाही. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.
नववधू आणि वर यांच्यातील लग्नाच्या पहिली रात्र ही छान पार पडली. दरम्यान, लग्नानंतर एके दिवशी वधू वराला म्हणाली, 'थांब मी येतेय.' मग तिने एका ग्लासमध्ये दूध आणले आणि त्याला ते पतीला पाजले. यानंतर, वधूने दुधात गुंगीचे औषध मिसळून घरातील सर्वांना ते पाजलं. त्यानंतर, तिने असे कृत्य केले की सर्वांना जबर धक्का बसला.
हे ही वाचा>> Mumbai: '40 वर्षांच्या मॅडमसोबत मुलाचे शारीरिक संबंध हे त्याच्या आई-वडिलांना माहिती होतं', समोर आली भलतीच माहिती
खरं तर, प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे. येथे राहणाऱ्या सचिनचे 4 जुलै रोजी कविता नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. लग्नाच्या 15 दिवसांनी, त्याची पत्नी कविताने दुधात गुंगीचे औषध मिसळले आणि घरातील सर्वांना झोपण्यापूर्वी ते पाजले.
त्यानंतर ती सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन घरातून फरार झाली. सकाळी घरातील सर्वजण जागे झाले तेव्हा वधू घरी आढळली नाही. चौकशी केली असता, घरात पैसे आणि सर्व दागिने गायब असल्याचे आढळले. ही संपूर्ण गोष्ट समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
हे ही वाचा>> 'वहिनी, दादाच्या जागी मी', दिराचे वहिनीसोबत अनेकदा लैंगिक संबंध, नंतर म्हणाला, 'आता तू मला...'
वधू दूध घेऊन आली आणि…
एवढी मोठी चोरी झाल्यानंतर घरातील सर्व लोक हे तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे पोहोचले आणि त्यांच्यासोबत जे घडलं ते सांगितलं. एसएचओ डीपी तिवारी म्हणाले की, ही टोळी काही श्रीमंत मुलांना हेरून आपल्या टोळीतील एका सुंदर मुलीचं खोटं खोटं लग्न लावून देतात. यानंतर, मुलींना संधी मिळताच घरातून रोख रक्कम आणि दागिने लुटून त्या पळ काढतात. टोळीतील सदस्य यामध्ये सहकार्य करतात. शमशाबाद गावातील सचिनसोबतही अशीच एक घटना घडली होती.
नवऱ्याला बसला मोठा धक्का
शमशाबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी टीपी तिवारी म्हणाले की, 22 जुलै रोजी तक्रारीच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिस सक्रिय झाले. बुधवारी धिमश्रीजवळ 4 जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात दरोडेखोर वधू कविताचा देखील समावेश आहे.