लातूर हादरलं! पत्नीनं पतीला विचारला प्रश्न, उत्तर देण्याऐवजी पती संतापला अन् पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळलं

Maharashtra Crime : एका 25 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिच्या पतीने जिवंतपणे जाळल्याचा आरोप आहे.

maharashtra crime

maharashtra crime

मुंबई तक

30 Jul 2025 (अपडेटेड: 30 Jul 2025, 11:51 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुरोगामी महाराष्ट्रातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

point

पतीने पत्नीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं

point

एका प्रश्नामुळे पत्नी मरणाच्या दारात

Maharashtra Crime : पुरोगामी महाराष्ट्रातील काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. राज्यातील लातूर जिल्ह्यातील रेणावूर गावात एका 25 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतीने केलेल्या या अमानवी कृत्याचं कारण ऐकून थरकाप उडेल. या कृत्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. दोघांमधील वादामुळे पतीने हे अमानुष कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : शनि ग्रहाने राशी बदलली, 'या' तीन राशीतील लोकांना लागली लॉटरी, खोऱ्याने ओढतील पैसे

तुमचं बाहेर अनैतिक प्रेमसंबंध आहेत का? 

संबंधित प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. पत्नीने तिच्या पतीला तुमचं बाहेर अनैतिक प्रेमसंबंध आहे का? असा प्रश्न केला असता, पती रागाने लालबुंद झाला आणि संतापाच्या भरात त्याने आपल्या पत्नीवर पेट्रोल ओतून तिला जाळून टाकलं. 

या कृत्याने पत्नी 70 टक्के भाजली असल्याचे आढळले. सध्या ती रुग्णालयात असून प्रचंड असहाय्य वेदनांशी सामना करत आहे. महिलेनं सांगितलं की, तिच्या सासू आणि मेहुण्यांचाही यामध्ये सहभाग आहे. जेव्हा तिच्या पतीने तिला जाळलं तेव्हा तिच्या सासूने आणि मेहुण्यांनी तिला खोलीत कोंडून ठेवलं होतं. पीडितेनं केलेल्या या आरोपामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर झालं. 

हेही वाचा : कोकणात पावसाची स्थिती स्थिर, तर राज्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी

या प्रकरणातून पोलिसांनी पती, त्याची मैत्रीण, सासू आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापही कोणालाही अटक केलेलं नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असता, या प्रकरणातील संपूर्ण सत्य नेमकं काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

    follow whatsapp