कोकणात पावसाची स्थिती स्थिर, तर राज्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी
Maharashtra Weather : राज्यातील 30 जुलै रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यातील हवामानाचा अंदाज

30 जुलै रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज पुढीलप्रमाणे
Maharashtra Weather : राज्यातील हवामान विभागाने 30 जुलै रोजी राज्यातील हवामानाच्या संदर्भात महत्त्वाचा अंदाज जारी केला आहे. राज्यातील मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष करून ठाणे, पालघर, रायगडमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जाणून घेऊयात 30 जुलै रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : तरुणानं महिला तरुणीला पाजली दारू, नंतर झुडपात नेलं अन् प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला हात...
कोकण :
कोकणातील पालघर, रायगड येथे ढगाळ वातावरणाची परिस्थिती असणार आहे. तर हलक्या सरींचा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. तर तापमान हा 28-29 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 20-30 किमी वेगाने वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर विशेषत: या भागातील शेतकऱ्यांना मान्सूनची परिस्थिती पाहता सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथ्यावर हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा आणि विदर्भ :
मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनची स्थिती जाणून घेतल्यास छत्रपती संभाजीनगर, जालना,नागपूर आणि अमरावती येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद राहणार आहे. विदर्भातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा राहिल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, या भागांत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.