Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतानं पाकड्यांना चांगलंच असमान दाखवलंय. 7 मे 2025 रोजी मंगळवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर हल्ला केला. ज्यात 26/11 च्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी अजमल कसाबनं प्रशिक्षण घेतलेलं सेंटर ध्वस्त करण्यात आलंय. या हल्ल्यात एकूण 90 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. याचे काही व्हिडिओज् आता समोर येत आहेत.
ADVERTISEMENT
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं 'इट का जवाब पत्थरसे' ही म्हण सत्यात उतरवली. ज्या महिलांचे पती पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी कायमचे सोडून गेले. ज्यामुळं महिलांचं कुंकू पुसलं गेलं, त्यांना हे समर्पित करण्यात आलंय. त्यामुळंच या प्रकरणाला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलंय.
हेही वाचा : 450 किमीची रेंज, बंकर्सही फोडतं... एअर स्ट्राईकमध्ये भारताने वापरलेलं स्काल्प आणि हॅमर शस्त्र कसं काम करतं?
या पूर्ण ऑपरेशनबाबत विचार केल्यास, आज भारतीय लष्करांची पत्रकार परिषद पार पडली. ज्यात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, लष्कराचे कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाचे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशनची संपूर्ण माहिती दिलीय. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला हवाई हल्ला करण्याचा व्हिडिओ समोर आलाय. ज्यात भारतीय लष्करांनी कारवाई करत आपली स्पष्ट भूमिका मांडत प्रत्युत्तर दिलंय.
कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंहने सांगितलं की, ऑपरेशन मध्यरात्री करण्यात आलं. यादरम्यान, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. ज्या ठिकाणी दहशतवादी संघटनांच्या विविध प्रशिक्षण केंद्रांचा यात समावेश होता.
हेही वाचा : 'ऑपरेशन सिंदूर'ची धुरा सांभाळणारी रणरागिणी व्योमिका सिंह आहे तरी कोण?
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील 'या' ठिकाणी हल्ला
पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फरनगरातील नाला ट्रेनिंग सेंटरचा समावेश आहे. जिथे पहलगाममध्ये घडवून आणलेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा समावेश करण्यात आला होता. मुजफ्फरनगरातील सैयदना बिलाल कॅम्पचा समावेश आहे. जिथे आतंकवाद्यांना हत्यारे, विस्फोटक पदार्थ बनवण्याची, वन्यजन्य परिस्थितीत राहण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
कोटालीतील लष्करांचं असणारं गुरपुर कॅम्प या ठिकाणीही हल्ला करण्यात आला होता. या गुरपुर कॅम्पमध्ये 2023 मध्ये काही श्रद्धांळूंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचं हे प्रशिक्षण केंद्र होतं.
कसाबनं प्रशिक्षण घेतलेलं सेंटर ध्वस्त केलंय
सियालकोटमधील सरजल कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांमध्ये अजमल कसाब आणि जेविड हेडली यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर भवालपुरमधील असणाऱ्या एका सुभानअल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यायलय होते. तिथंही दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं गेलं जात होतं.
ADVERTISEMENT
