NCP Political Crisis : अजित पवारांचे आमदार पवारांकडे येतील, शरद पवार गटाचा दावा

प्रशांत गोमाणे

• 11:31 AM • 07 Feb 2024

सुडबुद्धीच्या राजकारणाने हा निर्णय देण्यात आला आहे. अदृष्य शक्तीच्या मदतीने हे सगळ चाललंय. आणि ज्यांनी हे काय घडवलं त्याला महाराष्ट्र शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, असे अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर म्हटले आहे.

सुडबुद्धीच्या राजकारणाने हा निर्णय देण्यात आला आहे.  अदृष्य शक्तीच्या मदतीने हे सगळ चाललंय. आणि ज्यांनी हे काय घडवलं त्याला महाराष्ट्र शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, असे अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर म्हटले आहे.

sharad pawar vs ajit pawar ncp political crises a anil deshmukh clail mla will return sharar pawar group

follow google news

Sharad Pawar Vs Ajit Pawar, NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे आता अधिकृतपणे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयावर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात शरद गटाच्या नेत्याने अजित पवार गटातील नेते पवारांकडे परत येतील, असे मोठं विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.(sharad pawar vs ajit pawar ncp political crises a anil deshmukh clail mla will return sharar pawar group) 

हे वाचलं का?

शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. सुडबुद्धीच्या राजकारणाने हा निर्णय देण्यात आला आहे. अदृष्य शक्तीच्या मदतीने हे सगळ चाललंय. आणि ज्यांनी हे काय घडवलं त्याला महाराष्ट्र शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, असे अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर म्हटले आहे. 

अनिल देशमुख पुढे म्हणाले की, भाजप आमदारामंध्ये सध्या अस्थिरता आहे. कारण त्यांना माहितीय आम्ही पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आणि मागून आलेले जाऊन पंक्तित बसलेत. त्यामुळे सर्वाधिक नाराज हे भाजपचे आमदार आहेत. आणि आमचे जे आमदार आहेत, ते आमिशाला बळी पडून तिकडे गेले आहेत, ते सुद्धा नाराज आहेत. आणि यातले अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. 

मतदार संघात विकासाची कामे झाली पाहिजेत त्यामुळेच अनेक आमदार सरकारच्या जवळ गेले आहेत. पण जशा निवडणूका जवळ येतील, तशा या नेत्यांची घरवापसी होईल. त्यामुळे  नेक आमदार संपर्कात आहेत. वेळ आल्यानंतर ते पक्षात येतील, असा खळबळजनक दावा देखील अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच आमचा पक्षही शरद पवार आणि  चिन्हही शरद पवारच आहेत. त्यामुळे आमचे जे काही नाव असेल तो पक्ष आणि चिन्ह घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ.  आम्हाला जनता नक्कीच न्याय देईल, अशा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. 

    follow whatsapp