Vijay shivtare : 'अजित पवारांनी नीच...; शिवतारे बंडाच्या तयारीत

प्रशांत गोमाणे

13 Mar 2024 (अपडेटेड: 13 Mar 2024, 03:30 PM)

Vijay Shivtare Criticize Ajit Pawar : अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली, 23 दिवस लीलावतीत अॅडमीट होतो, मला बायपास करायला सांगितली. मी नाही केली. मी स्टेंट टाकल्या फेल झाल्या आणि मी कार्डिअक अॅम्ब्युलन्समध्ये माझा प्रचार केला.

   vijay shivtare criticize ajit pawar on baramati lok sabha constistuency supriya sule vs sunetra pawar maharashtra politics

''मरायला लागलात तर कशाला निवडणूक लढवताय. तुम्ही खोटं बोलतायत''

follow google news

Vijay Shivtare Criticize Ajit Pawar : शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठलीय, अशी बोचरी टीका शिवतारेंनी अजित पवारांवर केली. महायुतीत आल्यावर मी त्यांचा सत्कार देखील केला होता, पण त्यांची गुर्मी तशीच होती, असा हल्ला शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) केला आहे. तसेच आता माघार नाही, मी बारामती लढणार अशी भूमिका देखील विजय शिवतारेंनी मांडली आहे. त्यामुळे शिवतारे बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  (vijay bhshivtare criticize ajit pawar on baramati lok sabha constistuency supriya sule vs sunetra pawar maharashtra politics) 

हे वाचलं का?

विजय शिवतारे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना शिवतारेंनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. बारामती लोकसभा मतदार, हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे, कुणाची मालकी नाही, असे शिवतारे म्हणाले होते. 

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : शिंदेंचा पहिला उमेदवार ठरताच महायुतीत संघर्ष

2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्याच्या (अजित पवार) मुलाच्या विरोधात प्रचार केला होता. तो राजकारणाचा भाग होता. तो वैयक्तिक नव्हता. परंतू अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली, 23 दिवस लीलावतीत अॅडमीट होतो, मला बायपास करायला सांगितली. मी नाही केली. मी स्टेंट टाकल्या फेल झाल्या आणि मी कार्डिअक अॅम्ब्युलन्समध्ये माझा प्रचार केला. 

अजित पवारांनी त्यावेळी मला म्हणाले, ''मरायला लागलात तर कशाला निवडणूक लढवताय. तुम्ही खोटं बोलतायत. लोकांच्या सहानुभूती घेण्यासाठी करताय''. माझी गाडी, त्याचा नंबर ती कुणाची गाडी इतक्या खालच्या थराला अजित पवार गेल्याचा आरोप शिवतारेंनी केला. 

'तु कसा निवडून येतो हेच मी बघतो..महाराष्ट्रात मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाच ऐकत नाही मी पाडतो म्हणजे पाडतो...गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, पण गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात'',असा टोला देखील शिवतारेंनी अजित पवारांना लगावला.  मी त्यांना कधीच माफ केले होते. महायुतीत आल्यावर मी त्यांचा सत्कार देखील केला, मी भेटलो तरी त्यांची गुर्मी तशीच होती, अशी टीका देखील शिवतारे यांनी् केली. 

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : भाजपच्या खासदारांची धडधड वाढली; पक्ष देणार झटका?

बारामती लोकसभा मतदार संघात लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला, कुटुंबशाहिला आणि साम्राज्यशाहीला न मानाणाऱ्या सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार, अशी भूमिका विजय शिवतारे यांनी केली आहे. 

    follow whatsapp