Maratha Reservation: 'तो' फोन आला अन् मनोज जरांगे एका झटक्यात रुग्णालयातून...

मुंबई तक

27 Feb 2024 (अपडेटेड: 27 Feb 2024, 10:02 PM)

Maratha Reservation and Manoj Jarange: अंतरवाली सराटी गावातील मंडप आणि स्टेज पोलीस हटविणार अशी बातमी देणारा असल्याचा फोन हा आज मनोज जरांगे यांना आला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी तात्काळ रुग्णालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पाहा त्यावेळी नेमकं काय घडलं

follow google news

Manoj Jarange antarwali sarati: इशरार चिश्ती, जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागील 18 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे हे आंदोलन करत होते. मात्र, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी अचानक आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर त्यांना जालनातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, आज दुपारच्या सुमारास एक फोन येताच जरांगे हे एका झटक्यात रुग्णालयातून बाहेर पडले होते. त्यावेळी नेमकं काय झालं हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (maratha reservation manoj jarange left hospital in a flash when he got a call informing him that mandap and stage police would be removed from antarwali sarati village)

हे वाचलं का?

रविवारी (25 फेब्रुवारी) अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी एक सभा घेतली. ज्यामध्ये त्यांनी साधारण तासभर भाषण केलं. त्यानंतर ते अचानक उठून मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र, त्याच दिवशी ते जालना जिल्हातील भांबरी गावातून पुन्हा अंतरवाली सराटी येथे आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी उपोषण स्थगित केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर ते त्याच दिवशी उपचारासांठी दवाखान्यात दाखल झाले.

हे ही वाचा >> विधानसभेत SIT ची घोषणा होताच जरांगेंची तात्काळ दिलगिरी?

दुसरीकडे आज (27 फेब्रुवारी) त्यांच्याविरोधात सरकारने चौकशीसाठी SIT स्थापन करत असल्याची घोषणा केली. ज्यानंतर जरांगेंनी त्यांच्या भाषणात जे अपशब्द वापरले त्याविषयी दिलगिरी व्यक्त केली. 

एक फोन आला अन्...

पण एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र, अंतरवाली सराटीमध्ये वेगळं काही सुरू होतं. जेथे मागील अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत होते तिथेल मंडप, स्टेज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस हटवणार अशी बातमी अचानक समोर आली..

हे ही वाचा >> CM शिंदेंनी जरांगेंना स्पष्टच सांगून टाकलं, तुम्हाला...

याबाबत जरांगे यांच्या एक सहकाऱ्याने माहिती देण्यासाठी फोन तात्काळ जरांगे पाटील यांना केला. ही बाब ऐकताच जरांगे पाटील हे प्रचंड संतापले आणि त्यांनी तात्काळ रुग्णालयातून बाहेर पडून अंतरवाली सराटीला जाण्याची तयारी सुरू केली. 

मात्र, काही वेळातच त्यांना जालना जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला. प्रशासनाकडून असं काहीही होणार नाही असं आश्वासन त्यांनी जरांगे पाटलांना दिलं आणि त्यांनी पुन्हा उपचार घ्यावेत अशी विनंतीही केली. 

    follow whatsapp