विधानसभेत SIT ची घोषणा दुसरीकडे मनोज जरांगेंकडून तात्काळ दिलगिरी?, नेमकं...
Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगेंविरोधात एसआयटीची घोषणा होताच अवघ्या काही तासात जरांगेंनी फडणवीसांबाबत केलेल्या विधानविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मनोज जरांगेंंची तात्काळ दिलगिरी
जरांगेंच्या चौकशीसाठी SIT
फडणवीसांबाबत काय म्हणालेले जरांगे?
Manoj Jarange apologized on Devendra Fadnavis: मुंबई: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अत्यंत आक्रमकपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांना काही अपशब्द देखील वापरले होते. याशिवाय सरकारबाबतही बोलताना त्यांनी शिवीगाळ केली होती. हे सगळं होत असतानाच आज (27 फेब्रुवारी) सरकारने अधिवेशनात थेट जरांगे यांच्याविरोधात SIT स्थापन करण्याचे आदेश दिले. या घोषणेला काही तास होत नाही तोच मनोज जरांगे यांनी माध्यमांसमोर येत तात्काळ दिलगिरी व्यक्त केली. (as soon as the sit was announced manoj jarang immediately apologized what is really happening in the maratha reservation movement devendra fadnavis)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे हे उपोषणादरम्यान, अनेकदा सत्ताधाऱ्यांबाबत अपशब्द वापरत असल्याचं पाहायला मिळालं होतं. याचबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत जरांगेंवर कारवाईची मागणी केली. ज्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला SIT स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाची चौकशी केली जाईल. असं जाहीर केलं.
दरम्यान, विधानसभेत करण्यात आलेल्या या घोषणेनंतर काही तासातच मनोज जरांगे यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली.
हे वाचलं का?
मनोज जरांगेंची तात्काळ दिलगिरी..
'देवेंद्र फडणवीस साहेबांची ती किमया होती.. नेटवर्क सगळं बंद करणं.. लोकांमध्ये काही तरी वातावरण पसरून देणे.. काही तरी घडलं पाहिजे असं.. पण मी काही घडू देत नाही. मी शांतता भंग होऊ देणार नाही.. मी त्यांचा डाव हाणून पाडणार. शांततेत आंदोलन सुरू राहील. सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील.'
'मी पण ऐकलं.. विधानसभेच्या पटलावर छत्रपती शिवरायांचं नाव उच्चारलं आहे. त्यांचे विचार आणि त्यांच्या काळात असं होतं का.. तर आता छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मी या जनतेला माय-बाप मानतो.. आणि अनावधानाने माझ्याकडून ते शब्द गेले असतील. कारण माझ्या पोटात 17-18 दिवस अन्न नव्हतं.'
ADVERTISEMENT
'माता-माऊलींना मी मानतो.. त्यांनी विधानसभेच्या पटलावर तो विषय काढला की, आई-बहिणीवर बोलणं योग्य आहे का? तर आई-बहिणीवरून शब्द गेले असतील तर मी मागे घेतो आणि दिलगिरी पण व्यक्त करतो.'
ADVERTISEMENT
'कारण आई-बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणं.. कारण छत्रपतींचा विचार म्हटल्यावर त्यांनी तिने घेतलाय.. आणि मी छत्रपतींच्या विचारावरच चालतोय. तिथे मी मागे सरकणारच आहे.'
हे ही वाचा>> CM शिंदेंनी जरांगेंना स्पष्टच सांगून टाकलं, तुम्हाला...
'सग्यासोऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. त्यांच्या काय चौकशा आहे त्या बिनधास्त कराव्यात.. यंत्रणा त्यांच्या आहेत त्यांना कशा चालवायच्या आहेत.. काय करायचंय, काय धाक दाखवायचं ते करावं..'
'मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलला सडायला तयार आहे. लढायला पण तयार आहे. मी ओबीसीतून आरक्षण सग्यासोयऱ्याच्या अंमलबजावणी घेतल्याशिवाय मागे हटूच शकत नाही.'
'मात्र, हे खरं आहे की, आई-बहिणीला मानतो.. जनतेला मायबाप मानलंय.. आणि ते अनावधानाने उपोषणाच्या त्या यामध्ये चिडचिड असते. त्यात जर गेलं असेल. तर आई-बहिणीला मानतो म्हटल्यावर.. तुम्ही विधानसभेच्या पटलावर घेतलंय म्हटल्यावर.. छत्रपतींच्या काळात असं होतं का? तर मात्र मुख्यमंत्री साहेबांना किंवा त्यांना..'
'मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असेल.. सरकारला बोललो असेल.. तरी पण आई-बहिणीचा विषय आला म्हटल्यावर ते अनावधानाने माझ्याकडून आल्यावर ते शब्द मागे घेतो आणि दिलगिरी पण व्यक्त करतो. मात्र, ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही हटत नाही.' असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
जरांगेंच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत मनोज जरांगे यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले.
हे ही वाचा>> Manoj Jarange : 'मला जर अटक झाली ना...'
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. फडणवीस म्हणाले, "अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन होईल. मला या विषयावर बोलण्याची इच्छा नव्हती. पण, महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला माहितीये की, मी मराठा समाजासाठी काय केलं. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मुख्यमंत्री असेपर्यंत ते सुप्रीम कोर्टातही टिकवलं."
"मराठा समाजाच्या संदर्भात मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी जे काही केलं ते मराठा समाजाला आहे. मनोज जरांगे माझ्याबद्दल बोललण्यानंतर मराठा समाजा माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या नाही. सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल", असे फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT