बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना विद्यार्थ्यावर काळाचा घाला; रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत
Dombivali News : बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. डोंबिवलीतील सोहम कात्रे हा आज 10 फेब्रुवारी रोजी सकाळी बारावीचा बोर्डाचा पहिला पेपर देण्यासाठी कळवा येथील मनीषा विद्यालय या परीक्षा केंद्रावर जात होता. कळवा आणि मुंब्रा या रेल्वेस्थानकांदरम्यान तो चालत्या लोकल ट्रेनमधून पडला आणि त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लोकल ट्रेनमध्ये बारावीच्या मुलाचा पडून दुर्दैवी अंत
मुंबई उपनगरीय रेल्वेत वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
Dombivali News : बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. डोंबिवलीतील सोहम कात्रे हा आज 10 फेब्रुवारी रोजी सकाळी बारावीचा बोर्डाचा पहिला पेपर देण्यासाठी कळवा येथील मनीषा विद्यालय या परीक्षा केंद्रावर जात होता. कळवा आणि मुंब्रा या रेल्वेस्थानकांदरम्यान तो चालत्या लोकल ट्रेनमधून पडला आणि त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
हे ही वाचा : अजितदादा प्लास्टिक बाटलीवरून काचेच्या बाटलीचा वापर का करू लागले? रोहित पवारांनी घातपाताची मांडली थेअरी
लोकल ट्रेनमध्ये बारावीच्या मुलाचा पडून दुर्दैवी अंत
घडलेल्या घटनेनुसार, लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने सोहमचा तोल गेला आणि तो ट्रेनमधून पडला, अशातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी लोकल ट्रेनमध्ये अधिक गर्दी असल्याने ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून ठिकाठिकाणी प्रवास करावा लागतो. मुंबई उपनगरीय रेल्वेत वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत सोहमच्या अपघाताची लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. नंतर तातडीने नागरिकांच्या मदतीनं त्याला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, सकाळी 10:30 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हे ही वाचा : नागपुरात नवरा बायको मोबाईलच्या सहाय्याने चालवायचे सेक्स रॅकेट, पोलिसांनी रस्त्यातच रंगेहाथ पकडलं
सोहमची बातमी समजताच सोहमच्या पालकांना मोठा धक्का बसला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची रेल्वे प्रशासनानं गांभीर्यानं दखल घ्यायली हवी, अशी मागणी सोहमच्या कुटुंबियांनी केली आहे. सोहमचं शाळा प्रशासन देखील रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या रेल्वे प्रवासावर उपाययोजना कराव्यात, असं पत्र देणार आहेत.










