David Warner : वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती जाहीर, कारण…

प्रशांत गोमाणे

• 01:16 PM • 01 Jan 2024

डेविड वॉर्नर त्याच्या वनडे क्रिकेटमधील निवृत्तीवर म्हणाला की, नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेला फायनल सामनाच माझा वनडे क्रिकेटमधला शेवटचा सामना होता. ‘

david warner announces odi retirement swanfsong test austalia cricket

david warner announces odi retirement swanfsong test austalia cricket

follow google news

David Warner Announces Odi Retirement : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेट वर्तुळातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नरने वनडे क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहिर केली आहे. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) पाकिस्तानविरुद्ध तो शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. या त्याच्या निर्णय़ाने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (david warner announces odi retirement swanfsong test austalia cricket)

हे वाचलं का?

डेविड वॉर्नर त्याच्या वनडे क्रिकेटमधील निवृत्तीवर म्हणाला की, नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेला फायनल सामनाच माझा वनडे क्रिकेटमधला शेवटचा सामना होता. ‘मी निश्चितपणे एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत आहे. ही गोष्ट मी वर्ल्ड कप दरम्यानच म्हणालो होतो. त्यात आम्ही भारतात वर्ल्ड कप जिंकल्याने ही खरोखरच मोठी उपलब्धी असल्याचेही वॉर्नर सांगतो. मला माझी पत्नी कँडिस आणि तीन मुली – आयव्ही, इस्ला आणि इंडी यांना अधिक वेळ देण्याची गरज आहे, यासाठीच मी निवृत्ती घेतल्याचे वॉर्नर म्हणाला आहे.

हे ही वाचा : Lok Sahba 2024 Seat : ‘मनाने अजित पवारांसोबत’, शिरसाटांच्या दाव्यावर जयंत पाटलांनी सोडलं मौन

‘मला माहित आहे चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे आणि जर मी दोन वर्षांनंतरही चांगले क्रिकेट खेळलो आणि ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आघाडीच्या फळीतील फलंदाजाची गरज असेल तर मी पुन्हा निवृत्ती मागे घेऊन मैदानात उतरेन, असेही संकेत वॉर्नरने दिले आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित केले जाणार आहे.

दरम्यान वर्ल्ड कपमध्ये वॉर्नरने 11 सामने खेळले होते. जामध्ये त्यांनी 48.63 च्या सरासरीने आणि 108.29 च्या स्ट्राइक रेटने 535 धावा केल्या होत्या. यामध्ये दोन शतके आणि अर्धशतकांचा समावेश आहे. बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध 163 धावांची त्याची सर्वोच्च धावसंख्या केली होती.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : प्रकाश आंबेडकरांमुळे ठाकरे कात्रीत! फक्त दोनच पर्याय

वनडे-टेस्ट रेकॉर्ड

दरम्यान डेविड वॉर्नरने 161 वनडे सामन्यात 97.26 च्या स्ट्राईक रेटने 6 हजार 932 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी 22 शतक आणि 33 अर्धशतक ठोकली होती. वॉर्नरने आतापर्यंत 111 टेस्ट सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 8 हजार 695 धावा केल्या आहेत.त्याने टेस्टमध्ये 26 शतक आणि 36 अर्धशतक ठोकली आहेत.

वनडे आणि टेस्टमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर वॉर्नर आता ऑस्ट्रेलियासाठी T20 क्रिकेट खेळणार आहे. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. वॉर्नर इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. त्यामुळे आता तो गभरातील T20 लीगमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp