Uddhav Thackeray : प्रकाश आंबेडकरांमुळे ठाकरे कात्रीत! फक्त दोनच पर्याय

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

what will do Uddhav Thackeray if congress rejects to prakash ambedkar's vanchit bahujan aghadi.
what will do Uddhav Thackeray if congress rejects to prakash ambedkar's vanchit bahujan aghadi.
social share
google news

Prakash Ambedkar Uddhav Thackeray Lok Sabha election 2024 : ‘उद्धव ठाकरेंना सगळ्यांना सोबत घ्यायचं असेल, तर त्यांना आम्हाला इंडिया आघाडीत घ्यावं’, हे विधान आहे प्रकाश आंबेडकर यांचं. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात आधीच राजकीय आघाडी झालेली आहे. इंडिया आघाडीची चर्चाही नव्हती, त्यावेळी ठाकरे-आंबेडकर एकत्र आले. पण, आता आंबेडकरांच्या वंचितमुळेच ठाकरे कात्रीत अडकलेत का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण काँग्रेसने अजूनही वंचितला सोबत घेण्याबद्दल सस्पेन्स कायम ठेवला आहे. हाच मुद्दा वंचितची चलबिचल वाढवण्यास कारण ठरला आहे.

इंडिया आघाडीची काही दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे आणि त्यांच्या पत्राला उत्तर द्यावे, अशी सूचना शरद पवारांनी याच बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना केली. पण, यावर काँग्रेसकडून अद्यापही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या मनात काय? असा प्रश्न वंचित आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित होतोय.

हेही वाचा >> ‘अजित पवारांचे सोम्या-गोम्या दिल्लीत’, राऊत भिडले, केला पलटवार

शरद पवारही आंबेडकरांना सोबत घेण्यास तयार असताना काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरेंचे टेन्शन वाढलं आहे. कारण आंबेडकर स्वबळावर लढण्याचाही इशारा देत आहेत. आता प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे ठाकरेंडे दोन पर्याय उरल्याची राजकीय स्थिती सध्या आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना प्रस्ताव काय?

पत्रकार प्रशांत कदम यांना दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट भूमिका मांडली. आंबेडकरांनी सांगितलं की, “आम्ही उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितलं आहे की, तुम्ही पर्याय निवडा. आपण २४-२४ जागा लढवू असा प्रस्ताव मी दिला आहे. आता उद्धव ठाकरेंना ठरवायचे आहे. आम्हाला इंडिया आघाडीत घेतले नाही, तर तुम्ही आमच्यासोबत राहणार की इंडिया आघाडीत जाणार हे ठरवावे. आम्ही दोघे एकत्र लढलो, तर ३० जागांपेक्षा कमी येणार नाही. आम्हाला इंडिया आघाडीत घ्यायचे की आमच्यासोबत लढायचे हे उद्धव ठाकरेंना निवडावे लागेल. जर आम्ही इंडिया आघाडीत गेलो नाही, तर आम्ही स्वतंत्र लढणार. मग उद्धव ठाकरेंना सगळ्यांसोबत घ्यायचे असेल, तर त्यांनी आम्हाला इंडिया आघाडीत घ्यावे”, अशी त्यांनी भूमिका मांडली.

प्रकाश आंबेडकरांचं काय… काँग्रेसकडे लक्ष…

इंडिया आघाडीत सामील होण्याची इच्छा प्रकाश आंबेडकर गेल्या काही महिन्यांपासून करत आहे. उद्धव ठाकरेंकडून आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेतले जाणार, असा विश्वास व्यक्त करताहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांमध्ये आणि प्रकाश आंबेडकरांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. असे असतानाही शरद पवारांनी त्यांना इंडिया आघाडीत घ्यावे, अशीच भूमिका घेतली आहे. मात्र, काँग्रेसच्या मौनामुळे अनिश्चितता कायम आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महाविकास आघाडीचं जागा वाटप ‘या’ निकषावर ठरणार!

ठाकरेंना सोडावी लागू शकते आंबेडकरांची साथ?

काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीबद्दल स्पष्ट भूमिका मांडली जात नसल्याने मविआतील राजकीय संभ्रम कायम आहे. प्रकाश आंबेडकरांनी दिरंगाईवरून ठाकरेंना स्पष्ट मेसेज दिला आहे. त्यामुळे ठाकरेंसमोर दोनच पर्याय शिल्लक आहेत. लोकसभा निवडणुकीत विजयासाठी लागणाऱ्या मतांचं गणित बघता, ठाकरे महाविकास आघाडीला सोडणे शक्य नाही. त्यामुळे आंबेडकरांना मविआत घेण्यासाठीच प्रयत्न करणे ठाकरेंच्या हातात आहे. काँग्रेसकडून जर नकार आला, तर मात्र ठाकरेंना आंबेडकरांची साथ सोडावी लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT