Mumbai Hoarding Collapse: उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, भाजप आमदाराने फोटोच केला शेअर!

मुंबई तक

Mumbai Hoarding Collapse Politics: मुंबईतील घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणी नवं राजकारण सुरू झालं आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.

ADVERTISEMENT

भाजप, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप
भाजप, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप
social share
google news

मुंबई: मुंबईत काल (13 मे) अचानक आलेल्या वादळाने घाटकोपरमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळून भयंकर दुर्घटना घडली. ज्यामध्ये तब्बल 14 जणांना नाहक जीव गमवावा लागला. मात्र, असं असताना आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरू झाले आहेत. या होर्डिंग दुर्घटनेबाबत एक फोटो शेअर करून भाजप आमदार राम कदम यांनी थेट या प्रकरणी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरच खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे. (mumbai hoarding collapse sensational allegations against uddhav thackeray bjp mla ram kadam and sheetal mhatre shared the photo)

काल सायंकाळच्या सुमारास संपूर्ण मुंबईत सोसट्याचा वारा सुटला. वातावरणात अचानक बदल झाला आणि प्रचंड असं धुळीचे वादळ आणि पाऊस सुरू झालं. पण याच वेळी प्रचंड वारा सुटल्याने घाटकोपर येथील समता कॉलनीतील रेल्वे पेट्रोल पंप येथे असणार एक भलं मोठं होर्डिंग कोसळलं. ज्यामध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 80 हून अधिक जण जखमी झाले.

हे ही वाचा>> घाटकोपर दुर्घटनेत 14 मुंबईकरांनी गमावला जीव, कोणावर दाखल झाला गुन्हा?

दरम्यान, याच प्रकरणावरून आता भाजपने शिवसेना (UBT)ला आणि उद्धव ठाकरेंवर थेट आरोप करणं सुरू केलं आहे. याबाबत भाजप आमदार राम कदम यांनी एक फोटो ट्वीट करून उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

राम कदम आणि शितल म्हात्रेंचे थेट उद्धव ठाकरेंवर आरोप...

14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे..  श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात.. मनाला चीड आणणारे हे चित्र.. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते.. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही टक्केवारी साठी  14 लोकांचे नाहक बळी घेता आहेत.. कुठे फेडणार हे पाप..?

असं ट्वीट राम कदम यांनी यावेळी केलं आहे. तर यासोबत शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनीही याबाबत ट्वीट करून ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp