Lok Sabha : महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? ठाकरेंनी सांगितला आकडा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 how many seats maha vikas aghadi win udhhav thackeray tell the number pm narendra modi
तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते.
social share
google news

Uddhav Thackeray, Maha Vikas Aghadi : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मेला पार पडणार आहे. या निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे  लक्ष निकालाकडे लागले आहे. असे असताना अनेक नेत्यांनी लोकसभेत (Lok Sabha 2024) नेमक्या किती जागा जिंकता येतील? याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. त्यात आता शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील महाविकास आघाडी नेमक्या किती जागा जिंकेल? याचा अंदाज वर्तवला आहे. (lok sabha election 2024 how many seats maha vikas aghadi win udhhav thackeray tell the number pm narendra modi)

उद्धव ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ठाकरेंना महाविकास आघाडी नेमक्या किती जांगा जिंकेल? असा सवाल करण्यात आला होता. यावर ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या 48 पैकी 48 जागा येणार आहे. 35 जागा येणार मग कोणत्या 13 जागा पडणार?मग आपण अंदाज काढतो. मी अंदाज पंचे कधी सांगत नाही. मी जिंकण्याची तयारी करतो. म्हणून सांगतो  48 पैकी 48 जागा जिंकू आणि  4 जूनला इंडिया आघाडीच सरकार येणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

हे ही वाचा : "मोदींनी गडकरींनाही उडवून लावलं", मोदींच्या कॅबिनेटमधील किस्से

ठाकरेंची मोदींवर टीका 

उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. त्याच्या मुलाला तुम्ही सेटल करताय. घराणीच्या घराणी फोडून तुम्ही तुमच्याकडे घेतली. मला जो अडीच वर्षाचा शब्द दिला होता, तो जर तुम्ही पाळला असतात, तर तुम्हाला ही चोरी चपाटी करायची वेळ आली नसती. तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारल्याचा हल्ला ठाकरेंनी मोदींवर केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ठाकरेंचे मोदींना आव्हान 

मोदी जितकं गाईबद्दल बोलतात तितकं महागाई बद्दल का बोलत नाही. मणिपूरमध्ये मोदी का जात नाहीत. मोदींचं इतकं शौर्य आहे तर मणिपूरमध्ये त्यांची शेपटी का हलते? चीन ढेंगेत घुसतोय, त्याबद्दल मोदी का बोलत नाही, अशा प्रश्नांची सरबत्तीही ठाकरेंनी मोदींवर केली. तसेच भाजपने 10 वर्षात केलेली 10 कामे सांगावी, असे आव्हान देखील ठाकरेंनी मोदींना दिले आहे. 

हे ही वाचा : '...तर मी सुद्धा मोदींच्या मदतीला धावून जाईन', ठाकरेंचं मोठं विधान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT