Jiretop : मोदींना जिरेटोप घातल्याने उफळला वाद; आता प्रफुल पटेल म्हणाले...

मुंबई तक

Jiratop Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घातला. त्यावरून महाराष्ट्रात वाद उफाळून आला. या वादानंतर आता पटेलांनी एक पोस्ट शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे.

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदींना जिरेटोप घालताना प्रफुल पटेल.
प्रफुल पटेल नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालताना.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावरून वाद

point

प्रफुल पटेलांनी मोदींना घातला जिरेटोप

point

पटेलांनी जिरेटोप वादावर केला खुलासा

Jiretop Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्याने राजकीय वादाला तोंड फुटले. याचे महाराष्ट्रातील राजकारणात पडसाद उमटले विरोधकांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचे म्हणत सत्ताधारी महायुतीला धारेवर धरले. वाद वाढत असतानाच आता प्रफुल पटेल यांनी खुलासा करत भूमिका मांडली आहे. (Controversy has arisen due to wearing a jiratop on Modi. Now NCP Leader Praful Patel clear his stand about it.)

नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून १४ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी मोदींना शुभेच्छा देत त्यांच्या डोक्यात जिरेटोप घातला.

हेही वाचा >> ठाकरेंचा PM मोदींसह पटेलांवर हल्ला; 'ज्या डोक्यावर जिरेटोप घालताय, ते डोकं....' 

केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर दिसणारा जिरेटोप मोदींना घातल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रफुल पटेल आणि भाजपलाही सुनावले. यावरून वाद चिघळला असतानाच आता पटेल यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. 

प्रफुल पटेल काय म्हणाले?

"हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ", असे म्हणत प्रफुल पटेल यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp