Jayant Patil : "शरद पवार अजित पवारांची 'ती' इच्छा पूर्ण करणारच होते", पाटलांनी सोडलं मौन

मुंबई तक

ADVERTISEMENT

अजित पवारांसोबतच्या सुप्त संघर्षावर जयंत पाटील यांचे भाष्य.
अजित पवारांच्या मागणीबद्दल शरद पवार निर्णय घेणार होते, असे जयंत पाटील म्हणाले.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जयंत पाटील यांचे अजित पवारांबद्दल विधान

point

शरद पवार अजित पवारांना करणार होते प्रदेशाध्यक्ष

point

राष्ट्रवादीतील फुटीनंतर जयंत पाटलांचे विधान

Jayant Patil Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचबरोबर दोन शकले झालेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेते एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहेत. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. (Jayant Patil has claimed that Sharad Pawar was going to make Ajit Pawar the state president of NCP)

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत आपल्यावरही शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दबाव होता, असे पाटील यांनी सांगितले. 

पूर्ण दिवसभर हजेरी लावली -जयंत पाटील

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे विरोधक बोलतात. तुम्हाला धाक दाखवला गेला नाही का? तुम्हाला भीती नाही वाटली का? असा प्रश्न पाटील यांना विचारला गेला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> पवार, ठाकरेंना मोदींची 'ऑफर', चार राजकीय अर्थ! 

उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, "तो प्रयत्न एकदा झाला ना... पूर्ण दिवस मी तिथे हजेरी लावून आलो. मला वाटतं नाही की, तसा काही परिणाम झाला. भीती वाटो अगर न वाटो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष बदलण्याएवढी ती भीती मोठी नव्हती."

अजित पवारांच्या महत्त्वकांक्षेमुळे राष्ट्रवादी फुटली?

राष्ट्रवादी फुटण्याला अजित पवार यांची राजकीय महत्त्वकांक्षा कारणीभूत ठरली का? यावर पाटील म्हणाले, "त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षांची तिकडे जाऊन प्रगती झाली नाही. कारण त्यांची प्रतिमा खराब होणार आहे, हे त्यांना माहिती असावं. तरी देखील त्यांना ते पाऊल उचलावं लागलं. त्यातच सगळं आलं."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजप-शिवसेनेने उद्धव ठाकरेंना घेरले, पण भुजबळांनी केली 'सुटका' 

फूट पडण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईत मेळावा झाला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटलांकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदाबद्दलची नाराजी व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी त्यांनी पाटलांचं नाव न घेता केली होती. त्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी मोठं विधान केले. 

ADVERTISEMENT

"माझ्यात आणि त्यांच्या सुप्त असं काही नव्हतं. मुंबईतील मेळाव्यात त्यांनी इच्छा प्रदर्शित केली होती. त्या इच्छा प्रदर्शित केल्यामुळे कदाचित आणखी एक पाच-सात दिवस थांबले असते, तर त्यांची इच्छा शरद पवार पूर्ण करणारच होते, अशी माझी माहिती आहे", असे पाटील म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT