Tokyo Olympics मध्ये ऐतिहासिक कामगिरीचं फळ, FIH Ranking मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ तिसऱ्या स्थानावर

मुंबई तक

• 04:32 AM • 08 Aug 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाच्या FIH Ranking मध्ये सुधारणा झालेली असून पुरुष हॉकी संघाने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. उपांत्य फेरीत बेल्जिअमविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारताने कांस्यपदकाच्या सामन्यात जर्मनीवर ५-४ ने मात केली होती. जागतिक क्रमवारीत […]

Mumbaitak
follow google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाच्या FIH Ranking मध्ये सुधारणा झालेली असून पुरुष हॉकी संघाने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

हे वाचलं का?

उपांत्य फेरीत बेल्जिअमविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारताने कांस्यपदकाच्या सामन्यात जर्मनीवर ५-४ ने मात केली होती.

जागतिक क्रमवारीत सध्या पुरुषांमध्ये बेल्जिअम पहिल्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर तर भारतीय हॉकी संघ तिसऱ्या स्थानावर आहे. याआधी FIH Ranking मध्ये मनप्रीत सिंगचा भारतीय हॉकी संघ चौथ्या स्थानावर होता. मार्च २०२० मध्ये FIH Pro Hockey League मधल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने हे स्थान मिळवलं होतं. यानंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करत भारताने आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा केली आहे.

BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये ‘फिनीक्स’भरारी

दुसरीकडे महिला हॉकी संघानेही आठव्या स्थानावर उडी मारली आहे. याआधी जागतिक क्रमवारीत महिला संघ नवव्या स्थानी होता. २०१८ साली लंडनमध्ये पार पडलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचल्या होत्या. यानंतर २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही भारतीय महिलांनी रौप्यपदक मिळवलं होतं. या कामगिरीच्या जोरावर त्यांना क्रमवारीत नववं स्थान मिळवलं होतं.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठीच्या सामन्यापर्यंत धडक मारल्यानंतर महिलांच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून त्या आठव्या स्थानावर आल्या आहेत.

    follow whatsapp