IPL 2023: एका ओव्हरमध्ये 4 सिक्स मारणाऱ्या खेळाडूवर कारवाई; बसला लाखोंचा फटका!

मुंबई तक

27 Apr 2023 (अपडेटेड: 27 Apr 2023, 01:45 PM)

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉयने (26 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यात तडाखेबंद खेळी केली.

mumbaitak

mumbaitak

follow google news

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉयने (26 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यात तडाखेबंद खेळी केली. जेसन रॉयने या सामन्यात 29 चेंडूत 50 धावांची खेळी केली. शाहबाजच्या एकाच षटकात रॉयने 4 षटकार ठोकले. सामना गाजवणाऱ्या या खेळीनंतरही जेसन रॉयला बक्षिस मिळण्याऐवजी त्याच्या मॅच फीमधून 10 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. त्यामुळे त्याला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. (Jason Roy was charged under Section 2.2 of the Level 1 Offense of the IPL Code of Conduct.)

हे वाचलं का?

जेसन रॉयवर आयपीएल आचारसंहितेच्या गुन्ह्याच्या लेव्हल 1 च्या कलम 2.2 अंतर्गत कारवाई करण्यात आली. सामन्यादरम्यान क्रिकेट साधनांचा किंवा कपड्यांचा, मैदानावरील साधनांचा यांचा गैरवापर केल्यास कलम 2.2 अंतर्गत कारवाई केली जाते. यापूर्वी, आरसीबीविरुद्धच्या सामन्यात आवेशने विजयी धाव घेत आपले हेल्मेट जमिनीवर फेकले होते. यानंतर त्याच्यावर जेसन रॉयप्रमाणे कारवाई करण्यात आली. यामध्ये सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

IPL : खेळाडू खरेदी करण्यासाठी संघाकडे पैसे कसे येतात, कमाई कशी होते?

वॉर्नरलाही ठोठावण्यात आला मोठा दंड :

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरलाही 24 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

विराट कोहलीवर 24 लाखांचा दंड :

आरसीबीने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा स्लो रेटशी संबंधित चूक केली. यामुळे कर्णधार विराट कोहलीला 23 एप्रिल रोजी 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. यासोबतच इतर खेळाडू, सब्सस्टिट्यूट आणि इम्पॅक्ट प्लेअर्सलाही याचा फटका बसला. प्रत्येक खेळाडूला 6 लाख रुपये किंवा 25 टक्के मॅच फी यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे.

Ms Dhoni : ‘माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा’, धोनीने दिले निवृत्तीचे संकेत

हे कर्णधारही ठरले स्लो ओव्हर रेटचा बळी :

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनाही स्लो ओव्हर रेटशी संबंधित आचारसंहितेमुळे प्रत्येकी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

स्लोअर रेटवर काय कारवाई केली?

प्रत्येक सामना 3 तास 20 मिनिटांत संपला पाहिजे, हा आयपीएलचा नियम आहे. पण, अनेक सामने 4 तासांपेक्षा जास्त काळ चालले होते. आयपीएलच्या नियमानुसार एखाद्या संघाच्या कर्णधाराने पहिल्यांदा स्लो ओव्हर रेट केल्यास त्याला 12 लाखांचा दंड आकारला जातो. पण, जर कर्णधाराने स्लोओव्हर रेटची पुनरावृत्ती केली तर संपूर्ण संघाला दंड आकारला जातो.

अश्विनवरही झाली होती कारवाई :

राजस्थान रॉयल्सचा आर अश्विन आयपीएल आचारसंहिता 2.7 लेव्हल 1 नुसरा दोषी सापडला होता. यामुळे त्याला मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. CSK विरुद्धच्या सामन्यात सामन्याच्यामध्ये अंपायरने चेंडू बदलला होता. अश्विनने पंचांच्या या निर्णयावर असहमती आणि नाराजी दर्शविली होती. आयपीएल प्रशासनाकडून याबाबत एक प्रेस रिलीज जारी करुन माहिती दिली होती.

    follow whatsapp