अहो तुमच्याकडे पाणी येतंय का? Mumbai Indians च्या ट्विटची सोशल मीडियावर होतेय चर्चा

मुंबई तक

• 05:17 AM • 16 Sep 2021

इंग्लंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू हे आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी युएईत दाखल झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून आयपीएलचा उर्वरित हंगाम सुरु होणार असून काही खेळाडू आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत असून काही संघांनी सरावही सुरु केला आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने या उर्वरित हंगामाची सुरुवात होईल. अशातच मुंबई इंडियन्सने हॉटेल रुमवर एकमेकांशी बोलत […]

Mumbaitak
follow google news

इंग्लंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू हे आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी युएईत दाखल झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून आयपीएलचा उर्वरित हंगाम सुरु होणार असून काही खेळाडू आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत असून काही संघांनी सरावही सुरु केला आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने या उर्वरित हंगामाची सुरुवात होईल.

हे वाचलं का?

अशातच मुंबई इंडियन्सने हॉटेल रुमवर एकमेकांशी बोलत असलेल्या सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहचा फोटो टाकून केलेल्या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

अहो तुमच्याकडे पाणी येतंय का? अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.

मुळचा उत्तर प्रदेशचा असलेला सूर्यकुमार यादव हा आता पक्का मुंबईकर झाला आहे. स्थानिक क्रिकेटमध्येही तो मुंबईचं प्रतिनिधीत्व करतो. मुंबईतील सोसायटी, चाळींमध्ये पाणी आलं का यावरुन रहिवाशांमध्ये होणारा संवाद आणि सूर्यकुमार-बुमराहमधल्या युएईमधल्या फोटोची सांगड घालत मुंबई इंडियन्सने हे भन्नाट ट्विट केलं आहे, ज्याला नेटकऱ्यांनीही तुफान प्रतिसाद दिला आहे.

IPL 2021 : नवीन हंगामाला उरले अवघे काही दिवस, जाणून घ्या काय आहेत प्रत्येक संघासमोरची आव्हानं?

दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपलं मराठी थिम साँग प्रदर्शित केलं आहे, त्यालाही सोशल मीडियावरर चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

५ वेळा स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेला मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत अव्वल ४ संघांमध्ये आहे. त्यामुळे बाद फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी यंदा मुंबईला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

आनंदाची बातमी ! IPL 2021 च्या उर्वरित हंगामात प्रेक्षकांना मर्यादीत स्वरुपात परवानगी

    follow whatsapp