Lok Sabha Election 2024: 'आता त्यांनाच बाजूला घेऊन..', अजितदादा- अशोक चव्हाणांवरुन खरगेंचा PM मोदींना टोमणा

मिलिंद खांडेकर, मॅनेजिंग एडिटर

27 Apr 2024 (अपडेटेड: 27 Apr 2024, 08:20 PM)

Mallikarjun Kharge Exclusive Interview: भाजप आधी भ्रष्टाचाराचे आरोप करतं आणि त्याच लोकांन सोबत घेऊन सत्ता उपभोगतं असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केला आहे.

खरगेंची भाजपवर जोरदार टीका

खरगेंची भाजपवर जोरदार टीका

follow google news

Mallikarjun Kharge on Ajit Pawar and Ashok Chavan BJP: नवी दिल्ली: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप पुन्हा सत्तेत आलं तर संविधान बदलेल असा आरोप केला. याशिवाय भाजपने संस्थांचा गैरवापर करत महाराष्ट्रात ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं आज त्यांनाच सत्तेत सोबत घेतलं. असं म्हणत खरगेंनी नाव न घेता अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यावरून भाजपला टोमणा मारला. (exclusive interview mallikarjun kharge criticizes bjp over corruption issue also taunts ajit pawar and ashok chavan lok sabha election 2024)

हे वाचलं का?

'भ्रष्टाचारविरोधातील लढाई वेगवान करू नका असं त्यांना कोणी सांगितलंय? भ्रष्टाचाराविरोधात तुम्ही कारवाई करा पण त्यांनाच बाजूला घेऊन बसू नका.. आजवर तुम्ही जेवढ्या काही लोकांना भ्रष्टाचाराच्या नावाने घाबरुन तुमच्याकडे घेतलंय.. त्यांना पक्षात घेऊन तुम्ही राज्यसभा सदस्य बनवता.. मंत्री बनवता?' असं म्हणत खरगेंनी अशोक चव्हाण यांनी केलेल्या भाजप प्रवेशावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

हे ही वाचा>> पूनम महाजनांचं तिकीट कापलं.. उज्ज्वल निकमांना उमेदवारी!

तर ते पुढे असंही म्हणाले की, 'अनेक ठिकाणी तर मुख्यमंत्री पदासाठी देखील लोकं त्यांनी घेतली पण नंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं.' असा टोला त्यांनी अजित पवारांनाही यावेळी लगावला. 

इंडिया टुडे ग्रुपच्या Tak क्लस्टरचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची सविस्तर मुलाखत घेतली. न्यूज Tak च्या विशेष  मुलाखतीत खरगे यांनी संविधान बदल केला जाईल असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे त्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या राजकारणावरही भाष्य केलं.

वाचा मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्रातील भाजपच्या राजकारणाबाबत नेमकं काय बोलले..

प्रश्न: भाजपकडून संविधान बदललं जाईल असे आरोप केले जात आहेत. पण संविधानात नेमके कसे बदल केले जातील?

मल्लिकार्जुन खरगे: अनेक गोष्टी आहेत.. संविधान जे आहे आमच्याकडे आपल्याकडे पाहा आपण... मार्गदर्शक तत्वामधून राईट टू एज्युकेशन आणलं, राईट टू फूड सेक्युरिट यासारखे कायदे आणले. आम्ही आरटीआय अॅक्ट आणलंय.. अशा अनेक गोष्टी ज्या मार्गदर्शक तत्त्वात आहेत त्या हक्कात बदलू शकतात. शिक्षण संस्थामध्ये काँग्रेसने जे आरक्षण दिलं होतं.. त्या गोष्टी मेरीटच्या नावावर काढल्या जाऊ शकतात. 

ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांचा कसा वापर सुरूय.. असा गैरवापर कधी झाला होता? ते आता गैरवापर करत आहेत. कोणी गृहमंत्री सहकार खातं घेऊन डीसीसी बँक, साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित दुसऱ्या संस्था यांना कोणी त्रास दिला नव्हता.

हे ही वाचा>> काँग्रेस जिंकली तर मालमत्ता, मंगळसूत्र..?, खरगेंनी दिलं उत्तर

ते वेगळंच खातं होतं.. पण तेच खातं हातात घेऊन लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. आता महाराष्ट्रात जेवढे घाबरून पळाले.. त्यात काही साखर कारखान्याचे किंवा डिसीसी बँकेच्या कर्जासंबंधीच्या केसेस.. या गोष्टींची भीती दाखवून ते लोकांना पक्षात घेत आहेत. त्याचप्रमाणे ते संविधानाचा गैरवापर करतील. तसं ते करतच आले आहेत नेहमी..

भ्रष्टाचारविरोधातील लढाई वेगवान करू नका असं त्यांना कोणी सांगितलंय? भ्रष्टाचाराविरोधात तुम्ही कारवाई करा पण त्यांनाच बाजूला घेऊन बसू नका.. आजवर तुम्ही जेवढ्या काही लोकांना भ्रष्टाचाराच्या नावाने घाबरुन तुमच्याकडे घेतलंय.. त्यांना पक्षात घेऊन तुम्ही राज्यसभा सदस्य बनवता.. मंत्री बनवता? 

अनेक ठिकाणी तर मुख्यमंत्री पदासाठी देखील लोकं त्यांनी घेतली पण नंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं. जे डोळ्यांना दिसतं त्यासाठी सातत्याने पुरावे देण्याची गरज नाही.. 

ते भ्रष्ट लोकं आहेत हे तुम्हीच म्हटलं आहे.. त्याच भ्रष्ट लोकांना घेऊन तुम्ही आज हुकूमत करत आहात. पहिले तुम्ही म्हणालात की, लोकशाहीमध्ये जो जिंकेल त्यालाच सत्ता मिळेल. पण तुम्ही आतापर्यंत 444 आमदार सर्व पक्षांचे मिळून फोडले आहेत. त्यांना घेऊन तुम्ही सत्ता मिळवत आहेत. 

आमच्याकडचे एक मुख्यमंत्री त्यांना देखील तुम्ही भीती दाखवून स्वत:कडे घेतलं. त्यामुळे ते लोकं जे बोलतात ते एकदम चुकीचं आहे. असं खरगे यावेळी म्हणाले.

 

 

    follow whatsapp