Uddhav Thackeray : 'प्रत्येकाला धर्माचं स्वतंत्र आहे. कोणीही कोणत्याही स्थितीत आमिष दाखवून धर्मांतरण करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. पण, त्या बिलमध्ये जनतेसाठी काही प्रश्नांची उत्तरे मिळणं गरजेचं आहे. त्यात नमूद केलं की, धर्मांतराच्या घटनेत वाढ झाली. सध्या भाजप सरकार असूनही धर्मांतरात वाढ होत असेल तर ते अपयश कोणाचे आहे? असा उद्धव ठाकरे यांनी आज 16 मार्च रोजी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सवाल केला. आहे. नंतर त्यांनी गॅसवरून देखील राज्य सरकारसह केंद्राच्या कामगिरीवर प्रश्न केलेत आहेत.
ADVERTISEMENT
'लोक रस्त्यावरती का दिसताहेत?'
'लोक रस्त्यावरती का दिसताहेत? मुंबईतील 30 ते 40 टक्के रेस्टॉरंट बंद होतायत. यामुळे सर्वसामान्य जनता होरपळत असेल, ही समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचत नसेल तर त्याच्या यंत्रणेत गलथान परिस्थिती आहे. जो मुख्यमंत्री आपल्या जनतेच्या व्यथा जाणून घेत नाहीत, त्या व्यथा तशा नाहीयेत, असं जर म्हणत असेल तर या राज्याचं कठीण आहे,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी 16 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांसह केंद्र सरकारच्या कामगिरीवर बोट दाखवलं.
हे ही वाचा : नागपूर हादरलं! पेपरचं कारण देऊन मुलगा घरातून निघाला, एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन
पुढे सर्वपक्षीय बैठक बोलावण्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, त्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, 'टंचाई आणि महागाई यात फरक आहे. टंचाई असेल, पण किंमत का वाढत आहे. दुसरी गोष्ट पंतप्रधानांनी जो गॅस निर्मितीचा जो प्रकल्प सांगितला होता तो देखील लोकांनी करून पाहिलेला आहे.' पुढे ते म्हणाले की, 'शिवसेना ही नेहमीच सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढली आहे. ज्या लोकांच्या व्यथा आहेत, त्यांच्यासाठी शिवसेना तत्पर आहेच. आम्ही आंदोलनही करू, पण ज्यांच्या हातात हे सरकार आहे त्याबाबत पंतप्रधान कधी काहीही सांगणार आहेत की, नाही?' असा सवाल केला.
'भाजप सरकार असूनही धर्मांतरात वाढ'
तसेच पुढे त्यांना धर्मांतराबाबत विचारलं असता, ते म्हणाले की, 'प्रत्येकाला धर्माचं स्वतंत्र आहे. कोणीही कोणत्याही स्थितीत आमिष दाखवून धर्मांतरण करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. पण, त्या बिलमध्ये जनतेसाठी काही प्रश्नांची उत्तरे मिळणं गरजेचं आहे. त्यात नमूद केलं की, धर्मांतराच्या घटनेत वाढ झाली. सध्या भाजप सरकार असूनही धर्मांतरात वाढ होत असेल तर ते अपयश कोणाचे आहे? याचं उत्तर मिळावं. कोणत्या धर्मात धर्मांतरण केलं जातंय याची माहिती दिली तर आम्हाला देखील सावध राहता येईल. आमचे कार्यकर्ते अशा कामांत लक्ष देतील. जर कोणीही जबरदस्तीने धर्मांतरण करत असेल तर आमचा त्याला विरोध असेल', असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : पुणे : चाकणमध्ये 32 वर्षीय महिलेवर सहा भटक्या कुत्र्यांचा हल्ला, हातापायांचे लचके तोडून कपडे फाडले, मृतदेह विवस्त्रच...
विधानसभा अध्यक्षांची भेट
त्यानंतर त्यांनी विरोधीपक्ष नेते पदावरून राज्य सरकारवर टीकेचे अस्त्र डागले. 'नवीन सरकार आल्याने सालाबादप्रमाणे विरोधीपक्षनेते दोन्ही सभागृहात नसल्याने मी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली होती. विरोधीपक्षनेते पदाची नेमणूक व्हायचीये, याची आठवण करून देण्यासाठी आलो होतो, तर आपण आवश्यक ती नेमणूक करावी ही विनंती आहे'.
ADVERTISEMENT











