उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना दिलासा मिळणार? 17 वर्षे जुन्या प्रकरणाचा निकाल ठरला!

मिथिलेश गुप्ता

• 05:23 PM • 25 Aug 2026

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्याकडून 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एका कथित व्हिडिओवरून दाखल करण्यात आलेला अब्रुनुकसानीचा खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या संपूर्ण खटल्याचा निकाल 9 सप्टेंबर रोजी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Seventeen years old Defamation Case

Seventeen years old Defamation Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना दिलासा मिळणार?

point

17 वर्षे जुन्या प्रकरणाचा निकाल ठरला!

Seventeen years old Defamation Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्याकडून 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एका कथित व्हिडिओवरून दाखल करण्यात आलेला अब्रुनुकसानीचा खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तब्बल 17 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात कल्याण न्यायालयात अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ॲडव्होकेट जयेश वाणी यांनी पोलीस तपास आणि कथित सीडीबाबत अनेक गंभीर प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित केले, तर दुसरे आरोपी रमाकांत देवळेकर यांच्या वतीने ॲडव्होकेट विनोद जावळे यांनी आपल्या अशिलाला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा केला. या संपूर्ण खटल्याचा निकाल 9 सप्टेंबर रोजी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलं का?

काय आहे प्रकरण?

2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका जाहीर सभेत कथित व्हिडिओ दाखवून आपली राजकीय आणि सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत दिवंगत वसंत डावखरे यांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा अंतिम युक्तिवाद कल्याण न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संतोष आगे यांच्या न्यायालयात पार पडला. बचाव पक्षाने न्यायालयात सादर केलेले साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे सर्व आरोपींना जाणीवपूर्वक अडकवण्यात आल्याची बाजू मांडली.

हे ही वाचा : गर्लफ्रेंडने कारवर 3,400 वेळा केले किस, Video व्हायरल

राजकीय फायद्यासाठी कारवाई

या युक्तिवादादरम्यान बचाव पक्षाने पोलीस तपासाच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवले. तक्रार 25 तारखेला दाखल झाली असताना, पोलिसांनी त्याच्या तीन दिवस आधीच म्हणजे 22 तारखेला (सभेच्या दिवशी) काही साक्षीदारांचे जबाब कसे नोंदवले, असा सवाल उपस्थित करत या कालक्रमावर शंका व्यक्त करण्यात आली. याशिवाय, कथित सीडी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याच्या तारखांमधील तफावतीचा हवाला देत, जर सीडी दोनदा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली होती, तर त्याचे दोन वेगळे अहवाल का नाहीत, असा प्रश्नही विचारण्यात आला. तसेच उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आनंद परांजपे यांचा घटनेच्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग किंवा व्हिडिओशी थेट संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा न्यायालयात आलेला नाही, असे सांगत राजकीय फायद्यासाठी ही कारवाई केल्याचा दावा करण्यात आला.

हे ही वाचा : पीडितेला जंगलात नेत जिप्सीला बांधून केले अत्याचार, घरी परतल्यानंतर सांगितला घटनाक्रम

राजकीय वर्तुळाचे निकालाकडे लक्ष

दुसरीकडे, आरोपी रमाकांत देवळेकर यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की, सभेच्या परवानगीशी संबंधित पत्रावर त्यांच्या अशिलाची सही नव्हती; केवळ ते पत्र पोलीस ठाण्यात जमा केले म्हणून त्यांना आरोपी करण्यात आले. देवळेकर 2009 पासून या कायदेशीर लढाईला सामोरे जात आहेत. या प्रकरणात कलम 313 अंतर्गत सर्व आरोपींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असून, आता अंतिम युक्तिवाद संपल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष न्यायाधीशांच्या निर्णयाकडे लागले आहे.