गोपीचंद पडळकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, उमेदवारी अर्ज ठरला वैध

मुंबई तक

17 Oct 2026 (अपडेटेड: 17 Oct 2026, 09:23 AM)

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठी बाजी मारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवलेला त्यांचा उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा वैध ठरवला आहे.

Gopichand Padalkar News

Gopichand Padalkar News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक

point

गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

point

उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने ठरवला वैध

Gopichand Padalkar News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवलेला त्यांचा उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा वैध ठरवला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर झालेल्या तातडीच्या सुनावणीत पडळकरांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि आनंद लांडगे यांनी युक्तिवाद केला, तर प्रतिस्पर्धी उमेदवार विक्रम सावंत यांच्यातर्फे अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद मांडला. न्यायालयाच्या या निकालानंतर सांगली बँकेच्या निवडणुकीतील 'बिनविरोध' राजकारणाचा मार्ग बंद झाला असून, लढत आता अधिक रंगतदार होणार आहे.

हे वाचलं का?

सर्वोच्च न्यायालयात अपील

या निवडणुकीच्या सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विक्रम सावंत यांचे आक्षेप फेटाळून लावत गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला होता. मात्र, या निर्णयाविरोधात माजी आमदार विक्रम सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सावंत यांचे आक्षेप ग्राह्य धरत पडळकरांची उमेदवारी रद्दबातल ठरवली होती. उच्च न्यायालयाचा हा निकाल तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर झाल्याचे सांगत पडळकरांनी तात्काळ सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

हे ही वाचा : तीन महिन्यापूर्वी IT जॉबसाठी पुण्यात शिफ्ट झालेल्या तरुणासोबत काय घडलं?

राजकीय हालचालींना वेग

सर्वोच्च न्यायालयाच्या या सकारात्मक निकालानंतर जत विकास सेवा सोसायटी गटातून पडळकरांचा अर्ज अधिकृतपणे कायम राहिला आहे. ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे सांगली जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांसाठी होणारी निवडणूक आता अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले असून दोन्ही बाजूंनी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील वातावरण फिरलं, पुन्हा पाऊस घालणार धिंगाणा?

कार्यकर्त्यांचा जल्लोष

न्यायालयाचा हा निकाल येताच जत शहरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. हा निकाल म्हणजे न्यायदेवतेवरील विश्वासाचा विजय असून आगामी निवडणुकीत पडळकर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.